Radha Patil booked over Dahi Handi lavani performance in Pune saam tv
मुंबई/पुणे

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

Radha Patil Dance Video: आता बातमी आहे दहिहंडीतल्या अश्लील डान्सच्या वादाची.पोलिसांनी आता अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांवर आणि आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत. बिभत्स डान्स करणाऱ्या नेमक्या कोणत्या डान्सर गोत्यात आल्या आहेत? कोणती मंडळ यामुळे अडचणीत आली आहेत? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.

Rohit Kadam

पाहिलंत, महाराष्ट्रात सध्या पारंपरिक लावणीच्या नावाखाली बीभस्त नृत्याचं पेव फुटलंय . मात्र, याच अश्लील डान्समुळे राज्यातील दहीहंडी उत्सव मंडळांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात झालीये. पुण्यात प्रसिद्ध लावणी डान्सर राधा पाटील, मंडळांचे अध्यक्ष आणि आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे योग्यता प्रमाणपत्र सादर करण्याची अट असली तरी अश्लील हावभावाचाही उल्लेख गुन्ह्यात करण्यात आलाय.

या दोन्ही घटना पुण्यातल्या असल्या तरी दहिहंडीला मुंबई, ठाणे आणि इतर शहरांमध्ये मोठ्या संख्येनं अश्लील डान्सचे प्रकार सर्रास सुरू होते. त्यामुळे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभागानं यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय आणि या सर्व कार्यक्रमांच्या चौकशीची मागणी केलीय. सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीनंच या सर्व कार्यक्रमांवर आक्षेप घेतलाय. त्यात आता याबाबत पहिला गुन्हा राधा पाटील आणि पुण्यातल्या आयोजकांवर दाखल झालाय.

आता मुंबई आणि ठाण्यात झालेल्या दहिहंडी कार्यक्रमातल्या अश्लील डान्सही या निमित्तानं वादात सापडले आहेत. कारण अनेकांनी यापूर्वीच या कार्यक्रमांवर टीका केली होती. त्यामुळे आता या कारवाईची व्याप्ती वाढवणार का? राजकारण्यांनीच आयोजित केलेल्या या कार्यक्रमांवरही गुन्हा दाखल करण्यात येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT