Dahi Handi 2025 News  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Mumbai Dahi Handi 2025 News : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलंय. मुंबईत दिवसभरात आणखी एका गोविंदाचा मृत्यू झाला.

Vishal Gangurde

मुंबईत दहीहंडी उत्सवाता अपघातांची मालिका

मुंबईत २ गोविंदाचा अपघाती मृत्यू

दोन गोविंदाच्या मृत्यूने उत्सवाला गालबोट

मुंबईत दहीहंडी उत्सवात अपघाताची मालिका सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत आणखी एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. गावदेवी गोविंदा पथकातील एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात दोन गोविंदाच्या मृत्यूने उत्सवाला गालबोट लागलं आहे.

मुंबईच्या मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आणखी एका गोविंदाचा मृत्यू झाला. गावदेवी गोविंदा पथकातील हा गोविंदा असल्याची माहिती मिळत आहे. रोहन वाळवी असे गोविंदाचे नाव आहे. रोहनच्या मृत्यूने गावदेवी गोविंदा पथकावर दु:खाचा डोंगर कोसळला.

मानखुर्दमध्ये दुपारी ३२ वर्षीय जगमोहन शिवकिरण चौधरी या तरुणाचा हंडीसाठी दोरी बांधताना तोल गेला. त्यानंतर खाली कोसळून जगमोहनचा मृत्यू झाला. जगमोहन रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी उपचाराआधी मृत घोषित केले. जगमोहन चौधरीनंतर आता रोहन वाळवी नावाच्या गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात दोन गोविंदाचा मृत्यू झाल्याने उत्सवाला गालबोट लागलं आहे.

ठाण्यात १७ गोविंदा जखमी

ठाण्यातील दहीहंडी उत्सवात शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत एकूण १७ गोविंदा जखमी झाले आहेत. यामध्ये ५ आणि १० वर्षीय तीन बालकांचा समावेश आहे.जखमींपैकी ०५ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात झाले आहेत. तर १२ ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आलं होतं. यामध्ये दोन मुंबईतील तर एक नवीमुंबईतील गोविंदांचा समावेश आहे. तर उर्वरित १४ गोविंदा हे स्थानिक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja : लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांना माज; कुणी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार? VIDEO

Lingayat Community: 'लिंगायत जात नाही तर धर्म' धर्मावरुन नव्या वादाची ठिणगी

Lalbaugcha Raja: सामान्यांना धक्काबुक्की, सेलिब्रिटींना विशेष वागणूक; लालबागचा राजा मंडळावर टीकेची झोड

Sperm Quality: स्पर्म क्वालिटी वाढवण्यासाठी खा 'या' गोष्टी

Actress : त्याने स्पर्श केला अन्... प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन, स्वत: सांगितली आपबिती

SCROLL FOR NEXT