दगडूशेठ दर्शनानंतर अमित शहा देणार NDRF कॅम्पला भेट; कडक पोलीस बंदोबस्त
दगडूशेठ दर्शनानंतर अमित शहा देणार NDRF कॅम्पला भेट; कडक पोलीस बंदोबस्त दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

दगडूशेठ दर्शनानंतर अमित शहा देणार NDRF कॅम्पला भेट; कडक पोलीस बंदोबस्त

दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी-चिंचवड

पुणे : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज मावळ (Maval) मधील सुदुंबरे (Sudumbare) येथील NDRF च्या कॅम्पला भेट देणार आहेत. हेलिकॉप्टर मधून थेट NDRF च्या कॅम्पमध्ये दाखल होणार आहेत. NDRF मध्ये नवीन कॅम्पचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करणार आहेत. पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून NDRF च्या प्रवेशद्वारावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हे देखील पहा-

गृहमंत्री अमित शहा यांनी याआधी सुद्धा श्रीमंत दगडूशेठ (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir) बाप्पाचं दोनदा दर्शन घेतले आहेत. मात्र, गृहमंत्री आणि सहकारमंत्री म्हणून ते पहिल्यांदाच दर्शनाला आले आहेत आणि याच मनस्वी समाधान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शहा यांच्या हस्ते मंदिरात विविध विधी होणार असून, ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल अमित शहा नगरमध्ये होते. प्रवरानगरमध्ये त्यांनी सहकार परिषदेला संबोधीत केले आहे. आज अमित शहा पुणे दौऱ्यावर आहे. काल रात्रीच अमित शहाचं (Amit Shah) पुण्यामध्ये आगमन झालं आहे. कोथरुड मतदार संघाचे आमदार (MLA) चंद्रकांत पाटील, पुणे मनपाचे महापौर (Mayor) मुरलीधर मोहोळ यांनी अमित शहांचे स्वागत केले.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Nagar Election: ३० लाख ६७ हजार ७०७ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार

Jasprit Bumrah Yoker: बुमराहच्या चेंडूनं हवेतच बदलली 'चाल'; गुल झालेली दांडी पाहून सुनीलला काही सुचेना VIDEO

Maharashtra Politics: लोकसभेच्या रणधुमाळीत विधानसभेची तयारी? नाशिक, दिंडोरीत सर्वपक्षीयांचा 'सोयीनं' प्रचार

Mahadev App Scam: महादेव ॲपचं श्रीलंका कनेक्शन, EOW ने 200 खात्यांमधील 3 कोटी रुपये गोठवले

IPL 2024 MI vs KKR : अखेरच्या सामन्यातही मुंबईचा पराभव; केकेआर संघाचं प्लेऑफचं तिकीट कन्फर्म

SCROLL FOR NEXT