नागपुरात कार चालकानं पोलिसाला नेलं फरपटत...(पहा व्हिडिओ)

कारवाईपासून वाचण्याकरिता वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरूनच फरफटत नेल्याची धक्कादायक घटना
नागपुरात कार चालकानं पोलिसाला नेलं फरपटत...(पहा व्हिडिओ)
नागपुरात कार चालकानं पोलिसाला नेलं फरपटत...(पहा व्हिडिओ)Saam Tv

नागपूर : कारवाईपासून वाचण्याकरिता वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरूनच फरफटत नेल्याची धक्कादायक घटना नागपुरमध्ये (Nagpur) घडली आहे. पंचशील चाैक ते कॅनॉल रोड प्रचंड वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर शनिवारी दुपारच्या सुमारास एक सिल्व्हर कार धावत होती. चालकाच्या समोर बोनेटवर एक वाहतूक शाखेचा पोलीस (Police) जीव मुठीत घेऊन बसलेला दिसत आहे. पोलीस बोनेटवरून (bonnet) खाली पडला तर त्याचे काय होईल, याची सर्वांनाच कल्पना आहे.

यामुळे दुचाकीवरील २ तरुण सिनेस्टाईल दुचाकी दामटत कारच्या पुढे लावतात अन् चालकाला कार थांबविण्यास भाग पडले आहे. बाचाबाची, शिवीगाळ अन् रोष सोबत घेऊन कारचालक सीताबर्डी ठाण्यात पोहोचला आहे. काही वेळेतमधेच तो सहीसलामत पोलीस ठाण्यातून कार घेऊन निघून देखील गेला आहे. पोलीस दलात या प्रकरणाची कुजबुज सुरू असतानाच या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो, अन् नंतर प्रकरणाची माहिती देता देता पोलिसांची नुसती दमछाक झाली आहे.

पहा व्हिडिओ-

एमएच- ३१ सीपी- ९५९४ क्रमांकाच्या कारचा चालक शनिवारी दुपारी मॉरिस कॉलेजचा सिग्नल तोडून भरधाव वेगाने सीताबर्डीकडे निघाला होता. तो धोकादायक पद्धतीने कार चालवीत असल्याचे बघून पोलीस ऑन एअर मेसेज देऊन त्याचा पाठलाग कार्याला सुरवात केले. पंचशील चाैकामधून वळण घेऊन कारचालक कॅनाॅल रोडने निघण्याच्या तयारीत असतानाच, वाहतूक शाखेचा पोलीस सागर हिवराळे कारला आडवा होतो.

तो मोबाईल मध्ये फोटो घेत असल्याचे बघून कारचालक सरळ कार पुढे दामटत होता. सागर त्याच्या बोनेटवर उडी घेतला. आणि तरी देखील कार तशीच पुढे धावत राहिली होती. मागचे-पुढचे वाहनचालक हा प्रकार त्यांच्या मोबाईलमध्ये कैद झाले आहे. अंग चोरून बोनेटवर बसलेला पोलीस खाली पडला तर काय होईल, याची सर्वांनाच कल्पना होती. त्यामुळे जीव धोक्यात घालून २ तरुण कारच्या समोर आपली दुचाकी लावतात अन् चालकाला कार थांबवायला भाग पाडले आहे.

नागपुरात कार चालकानं पोलिसाला नेलं फरपटत...(पहा व्हिडिओ)
"हे किरायचं मंत्री पद''; पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर जहरी टीका

वाहनचालकांची गर्दी कारचालकाला घेरली. आणि पोलिस देखील घटना स्थळी पोहचले. शिव्या अन् रोष व्यक्त होत होता. नंतर कारचालकाला सीताबर्डी ठाण्यात नेण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर कारचालक हरीश शंकरराव भुजाडे (वय- ३५) आपली ओळख सांगत होता. तो सराफा व्यावसायिक असून इतवारीत राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. कारमध्ये २ महिला देखील होते. एकीला हेवी शुगर असल्याने डॉक्टरकडे जात होतो. घाईगडबडीत जे नको व्हायला ते झाल्याचे सांगून माफीनामा लिहून दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com