DADAR WHITE STRIPE CONTROVERSY: MNS ISSUES ULTIMATUM OVER JAIN COMMUNITY ROAD MARKINGS IN MUMBAI saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : शिवतीर्थच्या अंगणात पांढरी पट्टी! मनसे नेते संदीप देशपांडेंचा जैन समाजाला इशारा

Mumbai Dadar White Line Controversy : मुंबईतील दादर परिसरात जैन समाजासाठी काढलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून नव्याने वाद निर्माण झाला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महानगरपालिकेला अल्टिमेटम देत पट्टे हटवण्याची मागणी केली आहे.

Alisha Khedekar

  • दादर शिवाजी पार्क परिसरात पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद

  • मनसेने महानगरपालिकेला दुपारी ३ वाजेपर्यंत पट्टे हटवण्याचा अल्टिमेटम दिला

  • जैन समाजाचा दावा आहे की धर्मगुरूंच्या सोयीसाठी हे पट्टे रंगवण्यात आले

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध रिल्सस्टार प्रसाद वेदपाठक याच्या राहत्या बिल्डिंगखाली जैन समाजाने पांढरी पट्टी काढल्याचा वाद सुरु होता. ही घटना ताजी असतानाच मुंबईतील दादर परिसरात हा वाद नव्याने उफाळून आला आहे. या प्रकरणी मनसैनिक आक्रमक झाले असून दुपारपर्यंत या पट्ट्या काढून टाकण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. दरम्यान हा वाद आता कोणते नेमकं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दादर पश्चिम येथील डी.एस. बाबरेकर मार्गावर जैन मंदिरालगतच्या लेनमध्ये सुरुवातीपासून ते गोकुळधाम इमारतीपर्यंत हा पट्टा रंगवण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर आता संदीप देशपांडेंच्या दादरमधील जनसंपर्क कार्यालय परिसरातही पांढरी पट्टी मारण्यात आली आहे. या प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandip Deshpande) यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. यावर प्रतिक्रिया देताना देशपांडे यांनी महानगरपालिकेला स्पष्ट इशारा दिला. दुपारी 3 वाजेपर्यंत हे पट्टे हटवले नाहीत, तर मनसे कार्यकर्ते स्वतः त्या पट्ट्यांवर काळा रंग फासतील, असे त्यांनी जाहीर केले.

या पांढऱ्या पट्ट्या कशासाठी? (Dadar White Line Controversy)

जैन समाजातील काही जणांनी असा दावा केला आहे की, उन्हामुळे जैन धर्मगुरूंना चालताना त्रास होऊ नये, यासाठी पांढरी पट्टी आखल्या जात आहेत. उन्हातून चालताना ते या पट्ट्यांवरून चालणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

प्रसाद वेदपाठकसोबत (Prasad Vedpathak) काय घडलं?

युट्यूबर प्रसाद वेदपाठकने याबाबत आधीही मुद्दा उपस्थित केला होता. कैलास अव्हेन्यू सोसायटीत राहणाऱ्या प्रसादने आरोप केला होता की, काही जैन कुटुंबांनी सोसायटीतील इतर सदस्यांची परवानगी न घेता रस्त्यावर पांढरी पट्टी रंगवली. धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचा आदर असला तरी सार्वजनिक जागांवर अशा प्रकारचे बदल करण्यासाठी सर्व संबंधितांची संमती आवश्यक असल्याचे त्याने म्हटले होते. प्रसादच्या या भूमिकेला अनेक रहिवाशांनी पाठिंबा दिला होता. तसेच काही सदस्यांनीही या पट्टीला विरोध दर्शवत ती हटवण्याची मागणी केली होती. अखेर महानगरपालिकेने कारवाई सुरू केल्यानंतर प्रसाद वेदपाठक यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत पांढऱ्या पट्ट्यांवर रंगकाम सुरू झाल्याची माहिती दिली. तसेच या विषयाची दखल घेऊन बातमी प्रसिद्ध करणाऱ्या माध्यमांचे आणि पाठिंबा देणाऱ्या नागरिकांचे त्यांनी आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT