Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis Saam Tv
मुंबई/पुणे

Video: प्रभादेवी राडा प्रकरण; 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल, पाच अटकेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - प्रभादेवीत मध्यरात्री झालेल्या शिवसेना-शिंदे गटातील राडा प्रकरणी दादर पोलिसांनी (Dadar Police) शिवसेनेच्या 25 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे.

शिंदे गटातील संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या हातात तलवार, चॉपर आणि इतर हत्यार होती अशी तक्रार संतोष तेलवणे यांनी केली आहे. मारहाणीत मला दुखापत झाली शिवाय माझ्या गळ्यातील 1 लाख 40 हजार किमतीची सोन्याची चैन चोरीस गेली असे देखील संतोष तेलवणे यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हंटले आहे.

या घटनेमुळे शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तर उद्धव ठाकरे गटाला जशास तस उत्तर द्या, असे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले आहे.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाकडूनही सदा सरवणकर यांच्यासहित काही लोकांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे-ठाकरे गटात वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबाराचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला असून त्याची शहानिशा पोलिसांकडून केली जात आहे. आमदार सदा सरवणकर यांच्याकडे लायसन्स असलेली जर पिस्तुल असेल तर त्याचे रेकॉर्ड नजीकच्या पोलीस ठाण्यात असते. पोलीस हे रेकॉर्ड तपासतील ज्यामध्ये सरवणकर यांच्याकडे पिस्तुल आणि किती काडतुसे आहेत याची माहिती असेल.

पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या माहितीनुसार सदा सरवणकर यांच्याकडे तेवढी काडतुसे असणं आवश्यक आहे आहे. शिवाय पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज काढायला सुरुवात केलेली आहे.या प्रकरणात गोळीबाराचा जो आरोप केला जात आहे. त्यातील सत्यता पडताळण्यासाठी पुरेसे पुरावे तसेच साक्षीदार असणं आवश्यक असल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे.

कोणावर गुन्हा दाखल?

शिवसेना विभाग प्रमुख महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत, विनायक देवरुखकर, प्रथमेश बीडू, विपुल ताटकर, यशवंत विचले, विजय पांडे, चंदन साळुंखे, संजय सावंत, दुतेश रहाटे, रवी पड्याचील यांच्यासह इतर काही अज्ञातांविरोधात भारतीय दंड कलम 143, 147, 148, 149, 395, 324, 323, 504, 506 आदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care Tips: त्वचेला सीरम लावण्यापूर्वी ही काळजी घेताय ना?

Akola News : संशयित आरोपी मृत्यू प्रकरण : धक्कादायक माहिती आली समोर; कस्टडी रूमचा सीसीटीव्ही होता बंद

Mumbai Local News : लोकलगर्दी आणि जीवघेणा प्रवास! रेल्वे प्रवाशांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या मुलाखतीमधून...

Today's Marathi News Live : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Wooden Comb: केस विंचरण्यासाठी लाकडी की प्लास्टिकचा कंगवा वापरावा?

SCROLL FOR NEXT