Dadar Rada: Saam Tv
मुंबई/पुणे

Dadar Rada: कबुतरखान्याचा प्रश्न चिघळला, दादरमध्ये तुफान राडा; आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट, पाहा VIDEO

Dadar Kabutarkhana: कबुतरखाना बंद करण्यात आल्यामुळे दादरमध्ये जैन समाज आक्रमक झाला आहे. आंदोलकांनी कबुतरखान्यावर टाकण्यात आलेले ताडपत्री काढून टाकल्या. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.

Priya More

Summary -

  • दादर कबुतरखाना बंदीवरून जैन समाज आक्रमक

  • आंदोलकांनी बीएमसीने टाकलेली ताडपत्री काढून टाकली.

  • आंदोलक महिला आणि पोलिसांमध्ये झटापट झाली

  • कोर्ट आदेशामुळे बीएमसी कारवाई केली त्यानंतर जैन समाज संतप्त झाला.

दादरच्या कबुतरखाना परिसरामध्ये जैन समाज चांगलाच आक्रमक झाला आहेत. कबुतरखाना हटवण्यावरून जोरदार राडा केला जात आहे. जैन समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत दादरमध्ये आंदोलन सुरू केला आहे. महापालिकेकडून कबुतरखान्यावर टाकण्यात आलेली ताडपत्री आंदोलकांनी हटवली आहे. जैन समाजातील महिलांनी कबुतरखान्यात घुसून पालिकेने बांधलेली ताडपत्री काढली, बांबू देखील काढून फेकून दिले. सध्या घटनास्थळावर जोरदार घोषणाबाजी केल्या जात आहेत. यावेळी पोलिस आणि आंदोलनक महिलांमध्ये झटापट झाली.

मुंबई हायकोर्टाने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर पालिकेकडून दादर येथील कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून तो बंद करण्यात आला. तसंच कबुतरांना खायला टाकण्यास बंद घालण्यात आली. यावरूनच जैन समाज आक्रमक होत त्यांनी आज कबुतरखाना परिसरात आंदोलन केले. त्यांनी कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री हटवून निषेध केला. कबुतरांना खाद्य देणे हा आमचा धार्मिक प्रथेचा भाग आहे. कोर्टाच्या आदेशनानंतर बीएमसीने केलेली ही कारवाईमुळे आमच्या समजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे मत आंदोलनक महिलांनी व्यक्त केले आहे.

दादर कबुतरखान्याचा विषय चांगलाच तापत चालला आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने दादर कबुतरखान्यावर कारवाई केली. हा कबुतर खाना बंद करण्यात आला. मुंबई हायकोर्टाने कबुतरांना खायला घालण्यास मनाई केली. कबुतरांचा वावर परिसरात असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे. कबुतरांना दाणे, खाद्य देणाऱ्यांविरुद्ध थेट एफआयआर दाखल करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने महानगरपालिकेला दिले आहेत.

कबुतरखान्याविरोधातील या कारवाईला जैन समाजातील नागरिकांचा विरोध आहे. जैन समाजाने या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. दादर कबुतरखान्यावर जाळी टाकण्याच्या कामाला स्थानिकांनी विरोध केला. या कारवाईविरोधात जैन समाज आक्रमक झाला असून आज कबुतरखाना इथे कबुतरांसाठी जैन समाज रस्त्यावर उतरला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची आणि झटापट झाली. काही महिला आंदोलनकांनी त्याठिकाणी ठिय्या मांडला. मुंबई पोलिसांनी घटनास्थळावर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ महालक्ष्मी सणावर विरजण; मराठा महिलांनी घेतला निर्णय

Priya Marathe Death: 'तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं...'; जिव्हाळ्याची मैत्रीण गेल्यानं प्रार्थना बेहेरेला अश्रू अनावर

Manoj jarange patil protest live updates: सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात डॉग स्कॉड पथकाकडून पाहणी

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाच्या चार हातांचा अर्थ काय होतो? जाणून घ्या

Manoj Jarange Protest: आमची पोरं नव्हे मुख्यमंत्री हुल्लडबाज, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT