Dadar Kabutar Khana News  saam tv
मुंबई/पुणे

Dadar Kabutar Khana : कोर्टाचे आदेश पायदळी, कारच्या छतावर कबूतरांसाठी खाद्य ठेवलं; काही तासांत पोलिसांनी माज उतरवला

Dadar Kabutar Khana News : महेंद्र सकलेचाने कोर्टाचे आदेश पायदळी तुडवले. याच सकलेचावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या दादर येथील कबूतरखाण्यातील कबूतरांना खाद्य खाऊ घालण्यास बंदी असताना एका व्यक्तीने कारच्या छतावर ट्रे ठेवून दाणे खाऊ घातले. कबूतरांना दाणे खाऊ घातल्यानंतर मुंबई महापालिका आणि पोलिसांना ओपन चॅलेंज दिलं. कबूतरांसाठी आणखी १२ गाड्या आणणार असल्याचेही आव्हान महापालिका आणि पोलासांना दिलं. या प्रकारानंतर पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा नोंदवला. त्यानंतर त्याची कार देखील जप्त केली.

महेंद्र सकलेचा नावाच्या व्यक्तीने दादरच्या कबूतरखान्याजवळ कारच्या छतावर ट्रे ठेवून कबूतरांना दाणे खाऊ घालले. या प्रकरानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी महेंद्र सकलेचावर गुन्हा नोंदवला. पोलिसांनी सकलेचावर गुन्हा नोंदवत गाडी जप्त केली. तसेच त्याला नोटीसही दिली. मुंबई हायकोर्टाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या महेंद्र सकलेचावर पोलिसांनी कारवाई केली.

सकलेचाकडून कोर्टाची अवहेलना

मुंबई हायकोर्टाने कबुतरखाने बंद करण्याचा आणि सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यास सक्त मनाईचा आदेश दिला आहे. त्यानंतरही महेंद्र सकलेचा या व्यक्तीने कोर्टाची उघडपणे अवहेलना करत दादर कबुतरखान्याजवळ आपल्या कारच्या छतावर ट्रे ठेवून कबुतरांना दाणे टाकले.

एवढ्यावरच न थांबता आणखी १२ गाड्या आणून कबुतरांना खाद्य देण्याचीही त्याने उघडपणे घोषणा केली. साम टीव्हीने हा प्रकार उघड केल्यानंतर कायदा हालचालीला लागला. शिवाजी पार्क पोलिसांनी धडक कारवाई करत सकलेचावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याची गाडी जप्त केली आणि नोटीस बजावली.

मुंबई महापालिकेने हायकोर्टाच्या निर्देशानुसार दादरसह अनेक कबुतरखाने बंद केले आहेत. मात्र, जैन समाजाने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. दादर कबुतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा प्रयत्नशील आहेत. तर शिवसेनेने वेगळीच भूमिका घेतली आहे. हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. मात्र, 'कायदा काही करू शकत नाही' असा माज दाखवणाऱ्या सकलेचावर पोलिसांनी चाप बसवला. कार जप्त करून कोर्टाचा आदेश मोडण्याची किंमत चुकवायला लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Marathon News : ठाणे मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला; घरी गेल्यानंतर स्पर्धकाचा अचानक मृत्यू

Vande Bharat Express : पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्याहून शेगावला धावणार वंदे भारत एक्सप्रेस, वाचा सविस्तर

Beed Crime : बीडमधील गुन्हेगारी संपेना! ३० वर्षीय तरुणीवर गोळीबार, थेट छातीत गोळी घुसली

Maharashtra Live News Update: डोंबिवलीत हाय प्रोफाईल सोसायटीच्या निवडणुकीत हाणामारी

Independence Day 2025 : स्वातंत्र्याच्या ज्वालेतून पेटलेला प्रगतीचा मशाल...; १५ ऑगस्टसाठी खास प्रभावशाली भाषण, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT