Dadar Hanuman Mandir Notice Saam Tv
मुंबई/पुणे

Dadar Hanuman Mandir: हनुमान मंदिर नोटिशीला स्थगिती; रेल्वेचा निर्णय

Dadar Hanuman Mandir Notice: मंदिर पाडण्याच्या नोटीसवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती. तसेच हिंदुत्वावरूनही त्यांनी प्रश्न विचारला होता.

Bharat Jadhav

दादर येथील हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटिशीला स्थगिती देण्यात आलीय. आरतीआधी नोटीसला स्थगिती देण्यात आल्याची माहिती आमदार मंगाल प्रभात लोढा यांनी दिलीय. मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाबाहेर ८० वर्षांपासून जुने हनुमानाच्या मंदिरावरून राजकारण तापलं होतं. रेल्वेतील हमालांनी बांधलेले हे हनुमानाचे मंदिर असून त्याला पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस पाठवली होती. सात दिवसांच्या आत मंदिराच्या विश्वस्थांनी स्वत: मंदिर पाडावं किंवा रेल्वेकडून पाडण्यात येईल आणि खर्चही वसूल केला जाईल, असे या नोटीसमध्ये रेल्वेने म्हटलं होतं.

मंदिर पाडण्याची नोटीस बजावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. आदित्य ठाकरेंनीही राज्यातील महायुती सरकारवर हल्लाबोल केला होता. मंदिर पाडण्याचा ‘फतवा’ म्हणत ‘हे कोणते हिंदुत्व? आता भाजपच्या राजवटीत मंदिरेही सुरक्षित नाहीत. केंद्र आणि राज्य सरकार या प्रकरणी निष्क्रिय झाले का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला होता. दरम्यान आज भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी रेल्वेची नोटीसला स्थगिती देण्यात आल्याचं सांगितलं. लोढा यांनी रेल्वेमंत्र्याशीं फोनवरून संवाद साधत या नोटीस बाबत चर्चा केली होती.

काय आहे मंदिराचा इतिहास

दादर स्टेशन जवळील हनुमान मंदिराचा ८० वर्षापुर्वीचा इतिहास हनुमान मंदिराचे विश्वस्त प्रकाश कारखानीस यांनी सांगितला. येथील एका झाडाखाली ही मूर्ती मिळून आली होती. त्यानंतर त्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आल्याची माहिती कारखानीस यांनी दिली. दरम्यान हे मंदिर गेल्या ८० वर्षांपासून आहे.

मंदिर अनधिकृत नसल्याचे पुरावे मंदिर विश्वस्तांकडे असल्याचही कारखानीस म्हणालेत. जेव्हा वेळ येईल तेव्हा पुरावे समोर आणू. परंतु या मंदिराला कोणीही हात लावू शकत नाही. जर या मंदिराला हात लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही याचा विरोध करू असंही कारखानीस माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत आहेत, त्यावरून मोदींना सवाल करताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

हिंदूंवर हल्ले होत असताना विश्वगुरू शांत का बसलेत असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला होता. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी दादरमधील हनुमान मंदिराबाबत आलेल्या नोटीसवरून भाजपवर टीका केली होती.

का देण्यात आली होती नोटीस

रेल्वेने चार डिसेंबर रोजी मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांना ‘अतिक्रमण’ म्हणून नोटीस बजावली होती. रेल्वेच्या नोटीसनुसार, हे मंदिर रेल्वेच्या जमिनीवर परवानगी न घेता बांधण्यात आलंय. या रचनेमुळे प्रवासी आणि वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. दादर स्थानकावरील पायाभूत सुविधांच्या कामातही अडथळा निर्माण होत असल्याचं रेल्वे म्हटलं आपल्या नोटीसमध्ये म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

SCROLL FOR NEXT