D.S. Kulkarni News:  Saam tv
मुंबई/पुणे

D.S. Kulkarni News: बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना जामीन मंजूर; 5 वर्षांनी तुरुंगातून सुटका, गुंतवणूकदारांच्या ८०० कोटींचं काय?

Vishal Gangurde

अक्षय बडवे

D.S. Kulkarni News:

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर झाला आहे. डी. एस. कुलकर्णीं तब्बल ५ वर्षांनी तुरुंगातून बाहेर आले आहे. महंत सुधीरदास यांच्यासोबत भेटीचे समोर आल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी फेब्रुवारी २०१८ मध्ये बांधकाम व्यावयासिक डी.एस.कुलकर्णी, त्यांच्या पत्नी, मुलगा, मेव्हणे, जावई आणि इतर काही जणांना अटक करण्यात आली होती.

या प्रकरणात डी.एस. कुलकर्णी यांना पाच वर्षानंतर जामीन मिळाला आहे. गेल्या पाच वर्षात कुलकर्णी यांनी ठेवीदारांना एकही रुपये मिळाले न दिल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, कुलकर्णी यांना ज्या कायद्याअंतर्गात अटक झाली, त्या कायद्यांतर्गतच आोरोपींना किती कळ तुरुंगात ठेवता येतं? हे पाहून न्यायालयाने या प्रकरणात अडकलेल्या सर्वांना जामीन मंजूर केला, अशी माहिती मिळत आहे.

गुंतवणूकदारांना पैसे कधी मिळणार?

डी. एस.कुलकर्णी यांनी ठेवीदारांचे गेल्या काही पाच वर्षात एकही रुपया परत दिले नसल्याची माहिती मिळत आहे. कुलकर्णी यांच्याकडे विविध प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

डी. एस.कुलकर्णी यांच्यावर किती कर्ज?

कुलकर्णींवर काही बँकांचही १२०० कोटी रुपयांचं कर्ज आहे. या प्रकरणात एका राष्ट्रीयकृत बँकेच्या सर्वोच्च अधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली होती. कुलकर्णींची मालमत्ता विकून बँकांना सर्वात आधी रक्कम दिली जात आहे. यामुळे मालमत्ता लिलाव करून गुंतवणूकदारांना सर्वात आधी पैसे द्यावे, अशी मागणी गुंतवणूकदारांकडून केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT