Cyber Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Cyber Crime News : टेलिग्रामवर नोकरीचं आमिष दाखवून ६ लाखांची फसवणूक; मुंबईतील धक्कादायक घटना

Cyber Crime : टेलिग्राम अ‍ॅपवर नोकरीचं आमिष दाखवून एका नागरिकाची तब्बल ६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगाराला ओशिवरा पोलिसांनी गोव्यातून अटक केली.

Alisha Khedekar

  • टेलिग्रामवर नोकरीचं आमिष दाखवून ६ लाख ९ हजार ८८४ रुपयांची फसवणूक

  • आरोपी अमन परमार याला गोव्यातील कांडोलिममधून अटक

  • येस बँकेतील खात्याचा तपास आणि मोबाईल ट्रेसिंगद्वारे गुन्हा उघड

  • पोलिसांचा तांत्रिक तपास आणि सायबर पथकाची कौतुकास्पद कारवाई

संजय गडदे, मुंबई

मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. टेलिग्राम अ‍ॅपवर नोकरीचं आमिष दाखवून तब्बल ६ लाख ९ हजार ८८४ रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका सायबर गुन्हेगाराला ओशिवरा पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे गोवा येथून अटक केली आहे. या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी एका गंभीर सायबर गुन्ह्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणांत आरोपी असलेल्या अमन पास्कर परमार याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय घडलं ?

तक्रारदार नगानी यांना जून २०२५ मध्ये 'विजय' नावाच्या व्यक्तीने टेलिग्राम अ‍ॅपवरून संपर्क केला होता. विजयने त्यांना एका लिंकवर माहिती भरायला लावली व ऑनलाइन रेस्टॉरंट रेटिंगचं काम देण्याचं आमिष दाखवलं. सुरुवातीला थोडा परतावा मिळाल्याने त्यांनी यावर विश्वास ठेवला. मात्र नंतर बोगस बँक व्यवहाराच्या माध्यमातून त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने लाखो रुपये उकळण्यात आले.

नगानी यांच्या तक्रारीवरून मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 318(4), 319(2) BNS आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील 66(C)(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपीने वापरलेलं येस बँकेचं खाते ट्रेस केलं. त्यानंतर त्या खात्यातील व्यवहार, मोबाइल नंबर आणि सीसीटीव्ही फुटेजचं विश्लेषण करण्यात आलं. या तांत्रिक तपासातून आरोपीचा लोकेशन गोव्यातील कांडोलिम परिसरात असल्याचे निष्पन्न झालं.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद देवरे व सायबर पथकाने गोव्यात सर्च ऑपरेशन राबवत मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या आरोपी अमन पास्कर परमार याला ताब्यात घेतलं. आरोपीला अंधेरी न्यायालयात हजर केले असता ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांची तांत्रिक तपास यंत्रणा आणि सायबर गुन्ह्यांवरील सजगता अधोरेखित झाली आहे. ही कामगिरी व.पो.नि. प्रीतम बाणावली, पो. नि. प्रभात मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकातील पो.उ.नि. शरद देवरे, स.फौ. अशोक कोंडे, पो.शि. विक्रम सरनोबत आणि स्वप्नील काकडे यांनी केली.

दरम्यान, पोलिसांनी या फसवणुकीमागे आणखी आरोपी असण्याचा संशय व्यक्त केला असून, या सायबर जाळ्याचे इतर धागेदोरेही लवकरच हाती लागण्याची शक्यता आहे. नागरीकांनी सोशल मीडियावरून मिळणाऱ्या आकर्षक ऑफरच्या आमिषांना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT