Cyber Crime News in  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai KYC Fraud: मुंबईकरांनो KYC फ्रॉड पासून सावधान; ८ दिवसात ६० मुंबईकर अडकले जाळ्यात

Cyber Crime News : मुंबई पोलिसांनी काढल्या मार्गदर्शक सूचना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गाड

KYC Fraud News : मुंबईत सध्या KYC फ्रॉडने धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठ दिवसात तब्बल साठ मुंबईकर याला बळी पडले असून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे आणि हे प्रकार इथेच थांबले नसून केसेसची संख्या दिवसागणिक वाढत आहे. एखादी टोळी या सगळ्याच्या मागे असून पोलिसांनी मुंबईकरांना या फ्रॉडपासून वाचण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील काढल्या आहेत. (Latest Marathi News)

...अन्यथा तुमचं खात बंद होईल

सध्या तुमच्या मोबाईलवर राजरोज येणाऱ्या या KYC म्हणजेच know your customer update संदेशापासून जरा सावध रहा, कारण तात्काळ तुमचा KYC अपडेट करा अन्यथा तुमचं खात बंद होईल हे सांगणारे मेसेज वर जर तुम्ही विश्वास ठेवलात तर तुमचं नुकसान होण्याची शक्यताच जास्त आहे.

या मेसेजमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की तुमचा पॅन नंबर अपडेट करा अन्यथा तुमचं खात बंद होईल. या मेसेज मध्ये एक लिंक देखील देण्यात आली आहे जी तुम्हाला बँकेच्या संकेत स्थळा सदृश्य एका वेब पेज वर नेते जिथे तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक किंवा युजर आयडी तसेच तुमचा पासवर्ड मोबाईल, नंबर एंटर करण्यास सांगितलं जातं आणि एकदा का तुम्ही ते सगळं एंटर केलं की क्षणात तुमच्या खात्यातून पैसे गेलेच म्हणून समजा.

वाढत्या केसेस बघता मुंबई ( Mumbai) पोलिसांनी (Police) तपासाला सुरवात करत नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना देखील काढल्या आहेत जेणेकरून जोपर्यंत ही टोळी गजाआड होत नाही तोपर्यंत तरी या KYC फ्रॉडला बळी पडणाऱ्याची संख्या आटोक्यात ठेवता येईल.

मार्गदर्शक सूचना

  • अनोळखी नंबर वरून आलेल्या एसएमएस मधील लिंक्सवर क्लिक करू नये.

  • आपली गोपनिय माहिती वेबसाईट वर भरण्यापुर्वी नमुद वेबसाईटचा युआरएल व्यवस्थित तपासा, बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दया.

  • आपली केवायसी अपडेट करण्याकरीता आपल्या बँकेच्या जवळच्या शाखेत भेट दया.

  • केवायसी अपडेट संबधी येणा-या मेसेजला प्रतिसाद देवू नका,

  • बँकेच्या कार्ड तपशील, पिन, ओटीपी पासवर्ड इत्यादी वैयक्तिक किंवा अर्थिक माहिती कोणासोबत 'शेअर करू नका, बँक अधिकारी तुमचे गोपनीय बैंकिंग तपशील कधीही विचारत नाहीत.

  • तुमचा मोबाईलचा तसेच नेट बँकिंगचा पासवर्ड ठेवा.

  • सार्वजनिक वायरलेस नेटवर्क वापरणे टाळा.

  • लिंकवर क्लिक करण्याआधी विचार करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT