ग्राहकांनो सावधान! पुण्यात केरळ आंब्याची देवगड हापूस म्हणून होतेय विक्री  SaamTvNews
मुंबई/पुणे

ग्राहकांनो सावधान! पुण्यात केरळ आंब्याची देवगड हापूस म्हणून होतेय विक्री

पुण्यातील मार्केट यार्डात केरळ आंब्याची चक्क देवगड हापूस या नावाने विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : पुण्यातील मार्केट यार्डात केरळ आंब्याची (Kerala Mango) चक्क देवगड हापूस (Devgad Hapus Amba) या नावाने विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे (Pune) कृषी उत्पन्न बाजार समितीने फळ बाजारातील तीन अडत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. यामध्ये १ डझनचे ४२ बॉक्स बाजार समितीने जप्त केले आहेत.

हे देखील पहा :

बाजारात कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याची (Mango) देवगड, रत्नागिरी (Ratnagiri) येथून आवक होते. त्याशिवाय कर्नाटकातूनही आंबा येतो. मात्र, दोघांच्या चव आणि सालीमध्ये फरक आहे. कोकणातील हापूस आंबा रसाळ आणि चवीस चांगला असतो. त्यामुळे कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच या आंब्याच्या किंमतीही जास्त असतात. याचा फायदा घेत व्यापारी, विक्रेते नागरिकांची फसवणूक (Fraud) करतात. आंब्यांची अदलाबदल करून विक्री होत आहे, हंगामाच्या सुरवातीला असा प्रकार उघडकीस आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

Maharashtra News Live Update: मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

Cleaning Tips : ऑफिसच्या किंवा शाळेच्या बॅगमधून कुबट वास येतोय? या सोप्या पद्धतीने करा डिप क्लीन

Horoscope: पुढील ३० दिवस 'या' ८ राशींसाठी ठरणार खास! सूर्य गोचरामुळे पैसा, करिअर आणि यशाचे योग

SCROLL FOR NEXT