court order saam tv
मुंबई/पुणे

Breaking : मुंबईच्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा

साकीनाका बलात्काराच्या घटनेमुळं मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. साकीनाका बलात्काराच्या घटनेमुळं मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. अभियोग पक्षाच्या वतीने दिंडोशी सत्र न्यायालयात साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला देहदंडाची शिक्षा देण्याची मागणीही बुधवारी करण्यात आली होती. दरम्यान, आरोपी करवारुला बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देण्याचा महत्वपूर्ण निकाल आज दिंडोशी सत्र न्यायालयाने दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील साकीनाका परिसरात 10 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री आरोपी मोहनने एक महिलेवर बलात्कार करुन तिला जबर जखमी केले होते. राजावाडी रुग्णालयात पीडित महिलेला उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते.

मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही पीडितेचे प्राण वाचू शकले नाही. या गंभीर घटनेमुळं मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.दरम्यान, आज दिंडोशी सत्र न्यायालयाने आरोपी मोहन चौहानला बलात्काराच्या आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली आहे.

महिलांच्या सन्मानाविषयी महाराष्ट्र पोलीस जागरूक

मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत सरकारतर्फे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

साकीनाका घटनेतील मुंबई पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ हा १० मिनीटे इतका जलद होता. या बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी अत्यंत जलदगतीने पूर्ण केला. संबंधित आरोपीविरोधात सर्व पुरावे जमा करून पोलिसांनी अवघ्या १८ दिवसांत दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

पोलिसांनी चोखपणे आपले कर्तव्य बजावत हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली. त्यामुळे न्याय प्रक्रियेला गती मिळाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दाखवलेल्या कार्यतत्परतेबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे.

महिला सुरक्षितता आणि महिलांच्या सन्मानाविषयी महाराष्ट्र पोलिस अत्यंत जागरूक असल्याचा संदेश याद्वारे समाजात पोहोचावा, अशी अपेक्षा गृहमंत्र्यांनी व्यक्त केली.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

SCROLL FOR NEXT