विनोदवीर काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचं हास्यजत्रेपेक्षा मोठं हसं; आशिष शेलारांचं टीकास्त्र SaamTV
मुंबई/पुणे

विनोदवीर काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचं हास्यजत्रेपेक्षा मोठं हसं; आशिष शेलारांचं टीकास्त्र

राज्यात दोन ठिकाणी झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या दोन्ही ठिकाणी भाजपने विजय मिळवला असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी (MLC Election Result) आज सकाळपासून सुरु झाली असून राज्यात दोन ठिकाणी झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत या दोन्ही ठिकाणी भाजपने विजय मिळवला असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे.

हे देखील पहा -

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे (Shivsena) गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव करत भाजपचे (BJP) वसंत खंडेलवाल हे विजयी झाले तर तिकडे नागपूर विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे हे विजयी झाले आहेत. आणि आता याच निवडणुकांच्या निकालावरती राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याच निकालावरुन भाजपनेते आशिष शेलारांनी ट्विट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरती (Congress State President Nana Patole) टीका केली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये (Tweet) लिहलं आहे, 'नागपूर,अकोला निवडणूकीत आघाडीची 96 मतं फुटली. तिघांच्या विरोधात लढून भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा दणदणीत विजय! मुंबईत, धुळ्यात उमेदवारी मागे घेतली नसती तर असंच नाक कापलं असतं!..विनोदवीर काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचं हास्यजत्रेपेक्षा मोठं हसं! अशी खरमरीत टीका करतच त्यानी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

SCROLL FOR NEXT