Crime : विरार रेल्वे स्थानकाजवळ चोरट्याकडून तरुणाची हत्या! चेतन इंगळे
मुंबई/पुणे

Crime : विरार रेल्वे स्थानकाजवळ चोरट्याकडून तरुणाची हत्या!

पाकीट चोरल्यानंतर पाठलाग करणाऱ्या तरुणाची केली हत्या !

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई-विरार : विरार रेल्वे स्थानकाजवळ एका चोरट्याने  तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हर्षल वैद्य असें या घटनेत मयत झालेल्या तरुणाचे नाव असून तो विलेपार्ले येथे राहणारा आहे. काल रात्री ११ वाजताच्या सुमारास हर्षल आपल्या विरार मधील  नातेवाईकांकडे पूजा आटपून पुन्हा घरी परतत होता.

हे देखील पहा :

यावेळी रेल्वे स्थानकात तिकीट काढत असताना एक चोरटा त्याचे पाकीट हिसकावून पसार झाला. हर्षदने त्याचा पाठलाग केला असता तो विरार रेल्वे स्थानकाबाहेरील श्रेया हॉटेल च्या गल्लीत लपून बसला तिथे हर्षद त्याला पकडण्यासाठी गेला असता चोरट्याने त्यावर धारधार चाकूने जीवघेणा हल्ला केला.

या हल्ल्यात हर्षद या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मात्र, त्याने दाखवलेल्या धाडसामुळे या चोरट्याला पकडण्यात यश आले आहे. विरार पोलिसांनी या चोरट्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारताशेजारच्या ३ देशात अस्मानी संकट, १३०० हून अधिक लोकांचा मृत्यू, ८०० जण बेपत्ता

Maharashtra Live News Update: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन

Kandivali Tourism: थंडीच्या दिवसात फिरण्याचा प्लान करताय? दूर नकोच, कांदिवलीतील ही ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

Mumbai Local : मुंबई लोकलमधील धक्कादायक प्रकार, महिलेकडे पाहून अश्लील चाळे, पुढे काय झाले...

Success Story: मुलीच्या यशाचं बापाचा उर भरुन आला; IPS लेकीला वडिलांना केला सॅल्यूट; सिंधू शर्मा यांचा भावनिक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT