Mumbai Police: crime registered against the three Mumbai policeman for a ransom Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Police: मुंबईत वर्दीला डाग; तीन वसूलीबाज पोलिसांविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Police: याप्रकरणी दिलीप सावंत यांनी तपास केला असता तीन पोलीस अधिकारी वसुलीसाठी (Ransom) सक्रिय असल्याचे आढळून आले.

सुरज सावंत

मुंबई: अधिकाराचा गैरवापर करून पैसे उकळणाऱ्या 3 पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी सांगितले की, हे तीन पोलिस अंगडिया व्यापाऱ्यांकडून पैसे उकळायचे. काही दिवसापूर्वी मुंबईचे पोलिस (Mumbai Police) आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांच्याकडे तक्रार आली होती, त्यानंतर अतिरिक्त आयुक्त दक्षिण विभागीय दिलीप सावंत यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्यात आले होते. याप्रकरणी दिलीप सावंत यांनी तपास केला असता तीन पोलीस अधिकारी वसुलीसाठी (Ransom) सक्रिय असल्याचे आढळून आले, त्यानंतर तिघांविरुद्ध एलटी मार्ग पोलीस ठाण्यात वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. (crime registered against the three Mumbai policeman for a ransom)

हे देखील पहा -

पोलिस निरीक्षक ओम वनघाटे, सहायक पोलिस निरीक्षक नितीन कदम आणि पोलिस उपनिरीक्षक समाधान जामठाडे अशी आरोपी पोलिसांची नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले. या तिन्ही पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध भादंवि कलम ३८४ आणि ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

SCROLL FOR NEXT