Pune Crime Latest News, Pune Crime News Today SaamTvNews
मुंबई/पुणे

कौटुंबिक वादातून जावयाकडून सासऱ्‍याचा खून

कौटुंबिक वादाच्या कारणातून जावयाने सासऱ्यावर चाकूने वार करून, त्यांचा खून (killed) केल्याचा धक्कादायक प्रकार

गोपाळ मोटघरे

पुणे: कौटुंबिक वादाच्या कारणातून जावयाने सासऱ्यावर चाकूने वार करून, त्यांचा खून (killed) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या घटनेनंतर जावयाने हातात चाकू घेऊन पोलिस (Police) ठाणे गाठत खडकी पोलिसांना स्वत:च खुनाची कबूली दिली आहे. रमेश रामचंद्र उत्तरकर (वय- 65) रा. आकाशदिप सोसायटी खडकी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अशोक गुलाब कुडले(वय- 38) रा. खडकी बाजार असे अटक (Arrested) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News Today)

हे देखील पहा-

पोलिसांनी जावई आरोपीला (accused) ताब्यात घेतले आहे. कुडले हा उतरकर यांचा जावई आहे. 2019 पासून कुडले आणि त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक (family) कारणातून वाद सुरू होते. तेव्हापासून पती- पत्नी वेगळे राहत आहेत. कुडले त्याच्या आईसोबत, तर त्याची पत्नी वडिलांकडे राहते. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. तर उत्तरकर यांची दोन दुकाने असून त्यांनी दोन्ही दुकाने भाड्याने दिली आहेत. तर कुडले हा वडापावची गाडी चालवतो.

दरम्यान, त्यांच्यातील कौटुंबिक वाद न्यायप्रविष्ठ आहे. कुडले हा उत्तरकर यांना पत्नीला नांदायला पाठवा असे सातत्याने सांगत होता. तर उत्तरकर हे घटस्फोट घेण्याबाबत आग्रही होते. याच प्रकरणाबाबत बुधवारी न्यायलयात तारीख होती. न्यायालयात तारखेला हजर राहिल्यानंतर कुडले व उत्तरकर यांच्यात वाद झाले होते. आणि त्याने दुकानात जाऊन सासऱ्याचा खून केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT