Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : पुणे हादरले! वीट आणि दांडक्याने मारहाण करत महिलेची हत्या, ३ दिवस घरातच ठेवला मृतदेह

Pune Crime News : पुण्यात बाप-लेकाने वीट आणि लाकडी दांडक्याने महिलेची हत्या करून मृतदेह तीन दिवस घरात लपवला. दुर्गंधी येऊ लागल्यानंतर मृतदेह रिक्षेत टाकून स्मशानभूमीत फेकण्यात आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यातील लोहगाव परिसरात बाप-लेकाने वीट-दांडक्याने एका महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर

  • मृतदेह तीन दिवस घरातच लपवून ठेवला

  • दुर्गंधी सुटल्याने मृतदेह स्मशानभूमीत फेकला

  • सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं

  • मृत महिलेची ओळख आणि हत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात सध्या गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. हत्या, गोळीबार, चोऱ्यांसारख्या घटना सहज पाहायला मिळत आहे. या घटनांनंतर पुण्याचा बिहार होतोय का प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. अशाप्रकारची आणखी एक संतापजनक घटना पुण्यातून समोर आली आहे. बाप लेकाच्या जोडीने मिळून एका महिलेची वीट आणि लाकडी दांडक्याने मारहाण करुन हत्या केली आहे. धक्कदायक म्हणजे या महिलेची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह घरातच ठेवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहगाव स्मशानभुमी परिसरात एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाला ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता लाईट बंद असलेली संशयास्पद रिक्षा दिसुन आली. त्या अनुषंगाने लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी आणि येरवडा या भागातील रिक्षा गेलेल्या सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली.

तपासात आढळून आलेल्या संशयित रवी रमेश साबळे (वय ३५) आणि रमेश रामचंद्र साबळे (वय ६५) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या दोघांचीही चौकशी केली असता या दोघांनीही महिलेच्या हत्येची कबुली दिली. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी आणि आरोपी रमेश या दोघांनी मिळून महिलेला तीन दिवसांपूर्वी वीट आणि लाकडी दांडक्याने मारहाण करुन तिची हत्या केली. मात्र एवढ्यावरच न थांबता या दोघांनी महिलेचा मृतदेह घरामध्ये लपवुन ठेवला होता.

या दरम्यान तीन ते चार दिवस उलटून गेल्यावर या महिलेच्या मृतदेहाला दुर्गंधी सुटू लागली. शेजाऱ्यांनाही या दुर्गंधीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे आरोपी रवी आणि रमेश यांनी १८ नोव्हेंबर रोजी पहाटे महिलेचा मृतदेह एका रिक्षामध्ये भरून स्मशानभूमीत फेकला. हा सडलेला मृतदेह पाहून गावकऱ्यांनी पोलिसांना कळवल्याने हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान या बापलेकाच्या जोडीने या महिलेची हत्या का केली? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तसेच ही महिला कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नीतीश कुमार यांनी घेतली बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

Maharashtra New Highway: महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा महामार्ग! पुणे ते संभाजीनगर प्रवास होईल सुसाट; कसा असणार प्लान?

Lohagad Fort: विकेंडसाठी प्लान करताय? लोणावळ्यापासून १५ किलोमीटरवर वसलाय 'लोहगड किल्ला', नक्की भेट द्या

Madhuri Dixit : 'धकधक गर्ल' सोबत झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता, नवीन वेब सीरिजची घोषणा

'पैसे देऊन आमचे नेते फोडले', भाजप नेत्यावर शिंदेंचा आरोप; अमित शहांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT