Pune Airport
Pune Airport Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: पुणे विमानतळावर तरुणीने घातला राडा! अधिकाऱ्याची कॉलर खेचली अन् चावाही घेतला; पोलिसांनी केली अटक

Dnyaneshwar Choutmal

Pune Airport Crime: बसस्टॉप, लोकलमधील अनेक भांडणे तुम्ही आत्तापर्यंत पाहिली असतील, मात्र एका महिलेने थेट विमानतळावर राडा घातल्याची प्रकार समोर आला आहे. ही सर्व घटना पुणे विमानतळावर (Pune Airport) १२ मार्च रोजी रात्री १२ वाजता घडली असून या प्रकरणात या संदर्भात गुंजन अगरवाल (२४) या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, गुंजन अगरवाल ही महिला टॅक्सीमधून प्रवास करून विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांनी टॅक्सी चालकाला पैसे देण्यास नकार दिला. टॅक्सी चालकाने एअरपोर्ट ऑथॉरिटीकडे मदत मागितली. त्यामुळे टर्मिनल मॅनेजर भक्ती लुल्ला यांनी गुंजन यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी लुल्ला यांना शिवीगाळ केली तसेच विमानतळ प्रस्थान (departure) गेट क्रमांक १ वर रांगेत उभे असलेल्या नागरिकांमध्ये जाऊन गोंधळ घातला.

हा सगळा प्रकार जेव्हा विमानतळावर सुरक्षतेसाठी कार्यरत असलेल्या महिला निरीक्षक रूपाली ठीके यांना निदर्शनास आला त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपी अगरवाल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र आरोपी यांनी त्यांचे एक न ऐकता अगरवाल यांनी फिर्यादी यांची शासकीय ड्रेस ची कॉलर पकडली आणि त्यांना चापट मारली. इतकेच नव्हेतर आरोपी महिलेने त्यांच्या हाताला चावाही घेतला. त्यामुळे या तरुणीने थेट हल्ला केला आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तरुणीला अटक करण्यात आली आहे. (Pune News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

SCROLL FOR NEXT