दौंड: मेडीकलमध्ये चोरी, १ लाख ४५ हजार रूपयांची रोकड लंपास सागर आव्हाड
मुंबई/पुणे

दौंड: मेडीकलमध्ये चोरी, १ लाख ४५ हजार रूपयांची रोकड लंपास

दौंड शहराजवळील लिंगाळी या ठिकाणी असलेल्या युनिटी मेडीकेअर मध्ये चोरी

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

दौंड : दौंड शहराजवळील लिंगाळी (ता. दौंड) या ठिकाणी असलेल्या युनिटी मेडीकेअर मध्ये झालेल्या चोरीत १ लाख ४५ हजार रूपयांची रोकड चोरीस गेली आहे. दुकानात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ३ चोरटे दिसून आले आहेत. लिंगाळी या ठिकाणी दौंड महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वाराजवळ युनिटी मेडकेअर या औषध विक्री दुकानात ११ सप्टेंबर दिवशी पहाटे ३ ते साडेतीन वाजेच्या सुमारास ही चोरी झाली आहे.

हे देखील पहा-

पायी आलेल्या ३ चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडण्यासह शटर उचकटले आहे. दुकानाच्या समोरील आणि आतील बाजूच्या काउंटर मधील कुलूपबंद ड्रॅाव्हर उचकटून त्यामध्ये ठेवलेली १ लाख ४५ हजार रूपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान ही चोरी निदर्शनास आली आहे.

औषध विक्रीतून आलेली रक्कम एकत्रित करून सदर रक्कम दुकानातील कर्मचाऱ्यांनी दुकानात ठेवली होती. दुकानाचे मालक दादा भाऊसाहेब लोणकर यांच्या फिर्यादीनुसार दौंड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये ३ चोरटे दिसून येत आहेत. ते २२ ते ३० वयोगटातील आहेत.  सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp: व्हॉट्सॲपच्या ३ अब्ज युजर्सवर मोठं संकट, नव्या टूलने वाढवलं टेन्शन; तुमच्या मोबाइलवर ठेवतंय लक्ष

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

SCROLL FOR NEXT