डोंबिवलीतील लोटस बार वर दुसऱ्यांदा गुन्हे शाखा-३ ची कारवाई प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

डोंबिवलीतील लोटस बार वर दुसऱ्यांदा गुन्हे शाखा-३ ची कारवाई

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या लोटस बार वर दुसऱ्यांदा गुन्हे शाखा-३ ने कारवाई करत ४१ जणांना ताब्यात घेतले आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली: डोंबिवली पूर्वेला कल्याण-शीळ रोडवर असणाऱ्या लोटस बार वर कल्याण गुन्हे शाखा-३ ने कारवाई केली आहे. यामध्ये १० महिला १२ वेटरसह १९ ग्राहकांना ताब्यात घेत सोबत २४ हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या बारवर सलग दुसऱ्यांदा गुन्हे शाखा ३ च्या पथकाने कारवाई केली आहे. यामुळे मानपाडा पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उभे केले जात आहेत.

हे देखील पहा -

कल्याण-शीळ रोडवर असलेल्या लोटस बार वर ग्राहकांना देण्याकरिता तोकड्या कपड्यातील महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील कृत्य व हावभाव करत असल्याची गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस हवालदार राजेंद्र घोलप, पोलीस नाईक राजपूत यांच्या पथकाने दुसऱ्यांदा मानपाडा पोलीस स्टेशन च्या हद्दीत असणाऱ्या लोटस बार वर कारवाई केली.

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोटस बार वर केलेल्या कारवाईत १० महिला,१२ वेटर सह १९ ग्राहक अश्या एकूण ४१ जणांना ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी मानपाडा पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hotel Rooms Safety Tips: हॉटेलच्या रूममध्ये कुठे असतात छुपे कॅमेरे? बुकिंग करण्यापूर्वी तपासा या 4 महत्त्वाच्या जागा

Maharashtra News Live Update: प्रदीप पुणेकर हत्या प्रकरणी महाविकास आघाडीचा उद्या ठाण्यात मोर्चा

Hair Care: केसांची वाढ झपाट्याने होण्यासाठी आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? तुम्हीही करत नाही ना 'या' चुका?

GST Council Meeting: अटकेची तरतूद रद्द! रिफंड, क्रेडिट लिमिटसह GST मध्ये १० मोठे बदल

मुंबई-पुणे फक्त ४८ मिनिटांत, दिल्ली-वाराणसी अवघ्या ४ तासांत...; १६ लाख कोटी...भारतीय रेल्वेनं बघितलेलं 'बुलेट' स्वप्न सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT