Chalo App
Chalo App  Saam TV
मुंबई/पुणे

बेस्टचा प्रवास सुखकर होण्यासाठी ‘चलो’ ॲपची निर्मिती; आमदाराने केली उर्दू भाषेची मागणी

सुमित सावंत

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत (BMC) नागरिकांचा बेस्टचा प्रवास सुखकर होण्यासाठी ‘चलो’ ॲपची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. ‘चलो’ ॲपच्या माध्यमातून मुंबईकर नागरिकांना बेस्ट बसेस व रूट बाबतची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. हा उपक्रम चांगला आहे. या ॲपमुळे नागरिकांना प्रवास करण्यास फायदा होणार असल्याचे आमदार रईस शेख म्हणाले आहेत. परंतु सदर उपक्रम बेस्टमार्फत राबवला जात असताना इंग्रजी, हिंदी, मराठी, तेलगू, तमिळ. इ. विविध भाषांचा वापर ‘चलो’ ॲपमध्ये समाविष्ट केला आहे.

मुंबई शहर हे बहुभाषिक शहर आहे. परंतु मुंबई शहरामध्ये उर्दू भाषा बोलणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मुंबई महानगरपालिकेच्या उर्दू माध्यामांच्या अनेक शाळा मुंबई शहरात आहेत. याबाबत अनेक नागरिकांनी माझ्याकडे लोकप्रतिनिधी या नात्याने बेस्टच्या ‘चलो’ ॲपमध्ये उर्दू भाषेचा समावेश करावा अशी मागणी केलेली आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘चलो' ॲपच्या बेस्ट उपक्रमात उर्दू भाषा समाविष्ट करावी अशी मागणी आमदरा रईस शेख यांनी आदित्य ठाकरेंकडे केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah Yoker: बुमराहच्या चेंडूनं हवेतच बदलली 'चाल'; गुल झालेली दांडी पाहून सुनीलला काही सुचेना VIDEO

Maharashtra Politics: लोकसभेच्या रणधुमाळीत विधानसभेची तयारी? नाशिक, दिंडोरीत सर्वपक्षीयांचा 'सोयीनं' प्रचार

Mahadev App Scam: महादेव ॲपचं श्रीलंका कनेक्शन, EOW ने 200 खात्यांमधील 3 कोटी रुपये गोठवले

IPL 2024 MI vs KKR : अखेरच्या सामन्यातही मुंबईचा पराभव; केकेआर संघाचं प्लेऑफचं तिकीट कन्फर्म

Asaduddin Owaisi: एक दिवस असा येईल जेव्हा हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल: असदुद्दीन ओवेसी

SCROLL FOR NEXT