Covid positive prisoner escapes in Mumbai सूरज सावंत
मुंबई/पुणे

Mumbai: बाथरुमला जाण्याच्या बहाण्याने कोव्हिड पॉझिटिव्ह कैदी रुग्णालयातून फरार

Mumbai Crime: मुंबईच्या सेंट जाॅर्ज रुग्णालयातील ही घटना असून फुकरान गुलाब शेख (वय - २१) असं या फरार आरोपीचं नाव आहे.

सूरज सावंत

मुंबई: मुंबईत (Mumbai) एक धक्कादायक घटना घडली आहे. कोव्हिड पॉझिटिव्ह असलेला आरोपी रुग्णालयातून फरार झाला आहे. मुंबईच्या सेंट जाॅर्ज रुग्णालयातील ही घटना असून फुकरान गुलाब शेख (वय - २१) असं या फरार (Absconding) आरोपीचं नाव आहे. फुकरानला विक्रोळी पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती त्यानंतर त्याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. (Covid positive prisoner escapes in mumbai from hospital under pretext of going to bathroom)

हे देखील पहा -

आतड्यांचा त्रास होऊ लागल्याने फुकरानला उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात (J. J. Hospital) दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्याची कोविड-१९ ची आरटीपीसीआर चाचणी पाॅझिटिव्ह (Covid Positive) आल्याने शुक्रवारी फुकरानला सेंट जाॅर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. सेंट जाॅर्जच्या वार्ड क्रमांक १२ व २ माळा येथे उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान मंगळवारी सकाळी ८ वाजता बाथरुमला जात असल्याचे सांगून आरोपी फुकरानने पळ काढला. या प्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात कोविड नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT