COVID-19 Vaccine, Free COVID-19 Booster Shots, Coronavirus Vaccine Booster Shot
COVID-19 Vaccine, Free COVID-19 Booster Shots, Coronavirus Vaccine Booster Shot SAAM TV
मुंबई/पुणे

Covid 19 Booster Dose : कोविडचा बुस्टर डोस मोफत, महाराष्ट्रात काय? एकनाथ शिंदे म्हणाले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुढील ७५ दिवस १८ वर्षांवरील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. या देशव्यापी मोहिमेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Covid 19 Booster Dose free in Maharashtra Eknath Shinde) (COVID-19 Vaccine)

शुक्रवारपासून पुढील ७५ दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस (वर्धक मात्रा) मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल दिली. या देशव्यापी मोहिमेसंदर्भात आपली पंतप्रधानांशी काल चर्चा झाली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी दिली.

मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) यावेळी आरोग्य विभागास निर्देश दिले की, या मोहिमेमध्ये एकही दिवस वाया घालू न देता सर्व संबंधितांना बूस्टर मात्रा मिळालीच पाहिजे यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, आरोग्य संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे. याविषयी पुरेशी जनजागृती करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (Free COVID-19 Booster Shots)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला आहे. बुस्टर डोसची गरज पुन्हा निर्माण झाली आहे. हे सरकार शास्त्रीयदृष्ट्या निर्णय घेते. स्वतःहून कोणताही निर्णय घेतला जात नाही. १८ वर्षांवरील जे नागरिक सरकारी रुग्णालयांमध्ये बुस्टर डोस (Booster Dose) घेतील, त्यांना ते मोफत दिले जाणार आहे, अशी माहिती काल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली होती. देशातील सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. बुस्टर डोस सर्व सरकारी केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. (Coronavirus Vaccine Booster Shot)

Edited by - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

Zodiac Signs: 'या' ५ राशीच्या लोकांना नात्यापेक्षा Ego वाटतो महत्त्वाचा; क्षणात तोडतात नाती

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT