BMC : मुंबई पालिकेतील प्रभाग वाढीच्या निर्णयाला आव्हान देणारी भाजपची याचिका न्यायालयाने फेटाळली Saam TV
मुंबई/पुणे

BMC : मुंबई पालिकेतील प्रभाग वाढीच्या निर्णयाला आव्हान देणारी भाजपची याचिका न्यायालयाने फेटाळली

उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्याची आपली इच्छा नसल्याचे खंडपीठाने मत व्यक्त करत याचिका फेटाळली.

सूरज सावंत

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग संख्या वाढवणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. राज्य सरकारने आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकासाठी महापालिकेच्या प्रभागांची संख्या 227 वरून 236 केली होती याच प्रभाग वाढीच्या विरोधात भाजपने (BJP) याचिका दाखल केली होती.

भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा, न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य अभिजित सामंत आणि राजेश्री शिरवाडकर यांनी ही दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) निकालाविरुद्ध आव्हान देणारी विशेष याचिका दाखल करण्यात आली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आव्हान फेटाळले होते. याचिकाकर्त्याची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी जनगणना केल्याशिवाय जागा वाढवता येणार नाही, असा युक्तिवाद केला. त्यांनी लक्ष वेधले की शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती. गेल्या दहा वर्षांत लोकसंख्या वाढल्याचे खंडपीठाने निरीक्षण नोंदवले. रोहतगी यांनी सादर केले की लोकसंख्येच्या प्रमाणात नेमक्या जागांची संख्या वाढवविण्यासाठी जनगणना आवश्यक आहे.

उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्याची आपली इच्छा नसल्याचे खंडपीठाने मत व्यक्त करत याचिका फेटाळली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महाराष्ट्र सरकारने मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या वाढवण्याचा अध्यादेश जारी केला होता, मुंबई महानगरपालिकेची २०२२ मध्ये निवडणूक प्रस्तावित आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price :सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Railway Recruitment: १०वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, १०१० पदांसाठी भरती, वाचा सविस्तर

Smart TV: स्मार्ट टीव्ही खरेदीत मोठी बचत, ८६ हजार रुपयांची सूट घेण्याची संधी

Maharashtra Live News Update: जिल्हाप्रमुख पद विकणे आहे ,चंद्रपुरमधील होर्डिंग्जमुळे उडाली खळबळ

Water For Kids: खेळण्याच्या आधी लहान मुलांनी किती पाणी प्यावं? जाणून घ्या डॉक्टरांचं मत

SCROLL FOR NEXT