jitendra Awhad News Saam TV
मुंबई/पुणे

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा; कोर्टाने मुंब्रा पोलिसांना दिले 'हे' निर्देश

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.

कल्पेश गोरडे

Jitendra Awhad News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. आव्हाड यांना उद्या, मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत अटकेची कारवाई करू नये, असे कोर्टाने मुंब्रा पोलिसांना (Police) निर्देश दिले आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे, अशी माहिती त्यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी दिली. जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी मुंब्रा ठाण्याला पत्र लिहिलं आहे.

ऋता आव्हाड यांनी पत्रात म्हटले आहे, ' तक्रारदार महिला पोलीस संरक्षण मिळावे म्हणून आरोप करू शकते. आव्हाड यांच्या नावाने तक्रारदार महिलेला धमकीचा फोन जाऊन खोटी तक्रा होऊ शकते. त्यासाठी यांच्या नावाने तक्रारदार महिलेचा धमकीचा फोन जाऊन होऊ शकते. त्यासाठी अशी कुठलीही तक्रार पोलीस ठाण्याला तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र ऋता आव्हाड यांनी मुंब्रा पोलिसांना दिले.

जितेंद्र आव्हाडांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपावला आहे. या राजीनाम्यावर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ऋता आव्हाड म्हणाल्या, 'राजीनाम्याच्या निर्णय जनतेनी ठरवला पाहिजे. जितेंद्र आव्हाड हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात जनतेने घातली आहे. ते निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा त्यांनी माझी परवानगी घेतली नव्हती. पण आता वाटतंय की, देशात जे काही सुरू आहे, ते थांबायला हवं'.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane : ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार; काय आहे सरकारचा प्लान?

Beed Banner Controversy: वाल्मिक कराडसाठी निधी मागणाऱ्या व्हायरल पोस्टरमागे कोण?

Rishabh Pant Update : ऋषभ पंतबाबत मोठी अपडेट, मोठ्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार, टीम इंडियात कधी होणार एन्ट्री?

Bharti Singh Pregnancy: कॉमेडियन भारती सिंग ४१व्या वर्षी पुन्हा होणार आई; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

Maharashtra Politics: महायुती आणि मविआची रणनीती काय? पालिका निवडणुका स्वबळावर की युतीत?

SCROLL FOR NEXT