Navi Mumbai Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai : कुरिअरमधून गांजाची तस्करी फसली; पाेलिस तपास सुरु

दुसऱ्यादिवशी तरुणाने दुस-याचे आधार कार्ड आणि कपड्याचे बिल दिले.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : आता कुरिअरच्या माध्यमातून गांजाची तस्करी होत असल्याचा प्रकार नवी मुंबईत (navi mumbai) समोर आला आहे. कपडे कुरिअर करायचे असल्याचे सांगत तुर्भे मधील कुरिअर कंपनीत आलेल्या एका व्यक्तीवर संशय आल्याने कुरिअरद्वारे गांजाची तस्करी करण्याचा प्रयत्न फसला. (navi mumbai crime news)

मंगुसिंग राजपूत याची तुर्भेमध्ये कुरिअर एजन्सी आहे. त्याच्याकडे एक तरुण (youth) दोन बॉक्स घेऊन ते नवी दिल्ली व दिमापूर येथे कुरिअर करण्यासाठी आला होता. या तरुणाने दोन्ही बॉक्समध्ये कपडे असल्याचे सांगितले. प्रथम तरुणांकडे ओळखपत्र नसल्याने त्याचे पार्सल स्वीकारण्यात आले नाही तर दुसऱ्यादिवशी तरुणाने दुस-याचे आधार कार्ड आणि कपड्याचे बिल दिले.

दरम्यान बॉक्सचे वजन आणि बॉक्स मधून येणारा उग्र वास यामुळे कुरिअर एजन्सी चालकाला संशय आला. त्याने एपीएमसी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी दोन्ही बॉक्सची पाहणी करून पंचासमोर उघडून पाहिले असता त्यात ४५० ग्रॅम गांजा आढळून आला. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हे कुरिअरचे पार्सल देणाऱ्या तरुणाचा शोध पोलिस घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत जामखेडमधून रोहित पवार फक्त ८४२ मतांनी आघाडीवर

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रात भाजपच्या याशामागे आहेत २ सूत्रधार, अमित शहांनी दिली होती मोठी जबाबदारी

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

SCROLL FOR NEXT