नवी मुंबई : धावत्या एसी बसमध्ये प्रेमी युगुलाला शारीरिक संबंध ठेवणे भोवले आहे. नवी मुंबईत धावत्या एसी बसमध्ये शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुण आणि तरुणीविरोधात कामोठे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दोघांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकारानंतर दोघांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रेमी युगुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी केली जात होती. त्यानंतर कामोठे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पनवेल ते आयजीपीएल कंपनी मार्गादरम्यान सांयकाळी ५ वाजून ४५ वाजता ही घटना घडली आहे. या बसमध्ये जालिंदर जाधव नावाचे कंडक्टर ड्युटीवर होते. बस कळंबोली सर्कलला सिग्नलला थांबली, त्यावेळी दुसऱ्या बसमधील प्रवाशाने दोघांचं नको ते कृत्य कॅमेऱ्यात कैद केलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तरुणीचे अंदाजे वय १९ आहे. तर तरुणाचे अंदाजे वय २० आहे. दोघेही बसमध्ये होते. दोघांनी पालिकेच्या धावत्या एसी बसमध्ये बेकायदेशीर कृत्य केलं. दुसऱ्या बसमध्ये असलेल्या एका प्रवाशाने दोघांचं कृत्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले.
व्हायरल व्हिडिओनंतर एसी बसमधील कंडक्टरने या प्रेमी युगुलाच्या विरोधात गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्या प्रकरणी प्रेमी युगुलावर विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
प्रेमी युगुल अश्लील कृत्य प्रकरणात एसी बसच्या कंडक्टरवर निष्काळजीपणा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याने जोडप्याचे अश्लील कृत्य थांबवण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही. नवी मुंबई महानगरपालिकेने कंडक्टरविरोधातही कारवाई सुरु केल्याची माहिती मिळत आहे. आरटीआय कार्यकर्ते अनर्जित चौहान यांनी ही घटना उजेडात आणली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.