Mira Bhayander Municipal Corporation चेतन इंगळे
मुंबई/पुणे

महापालिकेच्या सभेत नगरसेवक Social Media वर व्यस्त; कसे सुटणार सर्वसामान्यांचे प्रश्न

Corona महामारीमुळे मागील दोन वर्षे प्रत्यक्ष महासभा घेण्यात आली नाही त्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर प्रत्यक्ष महासभा बुधवारी आयोजित करण्यात आली होती.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून (Mira Bhayander Municipal Corporation) तब्बल दोन वर्षानंतर बुधवारी ऑफलाईन महासभेच आयोजन करण्यात आले होते. या सर्वसाधारण महासभेत वार्षिक अर्थसंकल्पावर महत्वाची चर्चा सुरू असताना अनेक नगरसेवक समाज माध्यमांवर (Social Media) व्यस्त असल्याचं दिसून आले.

कोरोना (Corona) महामारीमुळे मागील दोन वर्षे प्रत्यक्ष महासभा घेण्यात आली नाही त्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर प्रत्यक्ष महासभा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. या वार्षिक अर्थसंकल्पावर महत्वाची चर्चा सुरू असताना अनेक लोकप्रतिनिधी (Corporators) फेसबुक व What'sApp व्हिडीओ बघण्यात व्यस्त असल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे या लोकप्रतिनिधीना शहरातील गंभीर प्रश्नवर बोलण्यासाठी महासभेच आयोजन करण्यात येते मात्र ते किती महत्व देतात हे त्याच्या वागण्यातून दिसले आहे.

शहरांच्या विकासाकरिता प्रत्येक भागातून निवडणूक प्रक्रिया करून लोकप्रतिनिधीची निवड करण्यात येते. जेणे करून शहरातील विविध प्रश्न समोर येऊन त्यावर योग्य तो निर्णय घेणे शक्य होत असते. परंतु काही बेजबाबदार लोकप्रतिनिधी महत्वाची महासभा सुरु असताना मोबाईल माध्यमांवर व्यस्त असल्यामुळे विकास होणार कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये भाजपाची एक हाती सत्ता असल्यामुळे सभागृहात ठराव मांडल्यानंतर अधिक काळ चर्चा न होता ठराव मान्य करण्यात येतो. परंतु अश्या परिस्थितीत महत्वाच्या महासभेत समाजमाध्यमांवर वेळ व्यतीत करून महासभेचा अपमान करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न निर्माण सर्व सामान्यांकडून विचारला जात आहे.

Edited By - Jagdidh Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy fruit: सफरचंद नाही तर 'हे' 1 फळं खाऊन तुम्ही राहाल डॉक्टरांपासून दूर

Gold Price Today : आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी उसळी, मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या भाव ₹१,४४,९३० तोळा, वाचा ताजे दर

Maharashtra News Live Update: बीड पोलिसांना 112 वर खोटा फोन करणाऱ्या दोघांवर गुन्हा

Shocking : मुंबई हादरली! प्रसिद्ध हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; बिझनेसमनला बेड्या

Hair Care Tips : तिशीतच केस पांढरे होत आहेत, काळेभोर केस या करण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करा

SCROLL FOR NEXT