नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सध्या तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या काटोल मतदार संघ सध्या वाऱ्यावर आहे. अशातच काँग्रेसने (Congress) या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलंय. त्यामुळं राष्ट्रवादी आपला गड शाबूत ठेवण्यासाठी तयारीला लागली आहे. आपल्या दिग्गज नेत्यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन आणि सभा आयोजित केल्या आहेत.
100 कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटकेत आहेत. त्यामुळं त्यांच्या काटोल या मतदार संघात लोकप्रतिनिधी नाही. अशात या मतदार संघातील विकास कामं थांबली आहेत. त्यामुळं काँग्रेससह इतर पक्षांनी या मतदार संघाकडे मोर्चा वळवला आहे त्यामुळे ही धोक्याची घंटा लक्षात घेता राष्ट्रवादीने (NCP) त्यांच्या पक्षातील मंत्र्यांचा निधी काटोल मतदार संघात आणला आहे.
हे देखील पहा -
या माध्यमातून काटोलमध्ये विकास कामांचा सपाटा सुरू केलाय. आमदार अमोल मिटकरी कालच काही विकास कामांचे भूमिपूजन करून गेले. पुढं धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, रोहित पवार (Dhananjay Munde, Supriya Sule, Rohit Pawar) यांचे दौरे होणार आहेत.
काटोल मतदार संघ हा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार संघ आहे. अनिल देशमुखांचा मतदार संघ म्हणून हा मतदार संघ ओळखला जातो. मात्र, अनिल देशमुख अटकेत असल्यानं आणि इतर पक्षांची या मतदार संघाकडे नजर टाकल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अलर्ट झालीय. हक्काचा मतदार संघ त्यांना गमवायचा नाहीय. त्यामुळेच दिग्गचं नेत्यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ शाबूत ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.