CoronaVirus: मुंबईकरांची चिंता वाढली, केवळ 4 दिवसांत वाढले 'इतके' रुग्ण... Saam TV
मुंबई/पुणे

CoronaVirus: मुंबईकरांची चिंता वाढली, केवळ 4 दिवसांत वाढले 'इतके' रुग्ण...

मात्र असं असलं तरी घाबरुन जाण्याची गरज नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे, कारण रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 97% आहे तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा 841 दिवस इतका आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईकरांसाठी एक चिंतेची बातमी आहे. मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ओमिक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर ही रुग्णवाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जातेय. राज्याचे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. डॉ. जोशी यांनी माहिती दिली की, मुंबईत (Mumbai) कोविडच्या (Covid19) पहिल्या लाटेत रुग्णसंख्या 706 वरुन 1367 पर्यंत पोहोचायला 12 दिवस लागले होते. तर कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या 683 वरुन 1325 पर्यंत पोहोचायला 20 दिवस लागले होते, मात्र आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णसंख्या 683 पासून 1377 पर्यंत पोहोचायला केवळ 4 दिवस लागले. म्हणजे केवळ ४ दिवसांत मुंबईत 694 रुग्ण वाढले आहेत, त्यामुळे तिसऱ्या लाटेची (Third Wave) शक्यता वर्तवली जातेय. (CoronaVirus: Mumbaikars' anxiety increased, 'so many' patients increased in just 4 days)

हे देखील पहा -

मात्र असं असलं तरी घाबरुन जाण्याची गरज नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे, कारण रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 97% आहे तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा 841 दिवस इतका आहे. तसेच 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीत कोविड वाढीचा दर हा केवळ 0.09% इतका आहे. सध्या मुंबईत 5803 सक्रीय रुग्ण आहेत. एकुणच पाहता रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढत असली तरी घाबरण्याचे कारण नाही, मात्र काळजी नक्कीच घेतली पाहिजे. मुंबई महानगरपालिका (BMC) देखील लोकांना नियम पाळण्याचे आवाहन करत आहे.

मास्क व्यवस्थित लावणं, सतत हात धुणं, एकमेकांमध्ये अंतर ठेवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोविड प्रतिबंधक लस घेणं या चार महत्वाच्या गोष्टी तज्ज्ञांनी सांगितल्या आहेत. तसेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता 15 ते 18 वयोगटातील लहान मुलांनाही येत्या 3 जानेवारीपासून लस देण्यात येणार आहेे. तसेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि आजारांची गुंतागुंत (Comorbidities) असणाऱ्यांना बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT