Rajesh Tope Saam Tv
मुंबई/पुणे

Corona Third Wave: राज्यात तिसरी लाट ओसरली, आरोग्यमंत्र्यांचा दावा

नवीन व्हेरियंटचं अजून कुठेही त्याचं इन्फेक्शन आढळून आलेला नाही असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) ओसरली आहे. मात्र काही शहरात जरी संख्या कमी होताना दिसली तरी काही भागात अजूनही रुग्णसंख्या वाढत असल्याचा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची (Corona) संख्या कमी होत आहे. तिसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. त्यामुळे मास्कमुक्त महाराष्ट्राची चर्चा कालपासून सुरू आहे. यावरच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज नेमकी काय चर्चा झाली ते स्पष्ट केलं आहे. शिथिलता आणण्याची परिस्थिती आहे का याबाबत मार्गदर्शन टास्क फोर्सने मार्गदर्शन करावं याबाबत बैठकीत चर्चा झाली. नवीन व्हेरीअंट बाबत डेडली आहे असं मी ऐकलं. त्याचा अभ्यास सुरु आहे. WHO त्याचा अभ्यास करत आहे. अजून कुठेही त्याचं इन्फेक्शन आढळून आलेला नाही असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.

राज्यात तिसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण वाढत होते. त्याचबरोबर ओमिक्रॉनचाही धोका वाढत होता. त्यामुळे राज्यात काही निर्बंध लावण्यात आले होते. शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले होते, परंतु रुग्ण संख्या कमी होत आहे आणि मृत्यूदरही कमी होत आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या मंत्रीमंडळाने स्थानीक परिस्थीती पाहून गोष्टी सुरु कराव्यात अशू परवानगी दिली होती.

राज्यात बुस्टर डोस द्यायलाही सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर मुलांचे लसीकरणही वेगात सुरु आहे. लसीकरणाचा टक्का वाढल्यामुळे राज्यात कोरोना रुग्ण रुग्णलयापासून दूर राहत आहेत. रुग्णलयात भरती होणाऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेवरचा भार हलका झाला आहे. त्याचबरोबर आता कोरोनाची लस मेडीकल स्टोअर्समध्येही मिळणार आहे. त्यामुळे लसीकरण अधिक वेगात होईल अशी अपेक्षा आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Western Railway Block : मुंबईकरांनो लक्ष असू द्या! पश्चिम रेल्वेवर रविवारी ५ तासांचा जम्बो ब्लॉक, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा |VIDEO

Maharashtra Live News Update: अजित पवार पुण्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार

Oppo Find X9: भारतात २०० एमपी कॅमेरासह 'हा' नवीन फोन होणार लाँच, कंपनीने दिली ९९ रुपयांची खास ऑफर

Samantha Ruth Prabhu: साऊथ अभिनेत्री समांथाने कथित बॉयफ्रेंडसोबतचा फोटो केला पोस्ट, फोटोंवर लाईक्सचा होतोय वर्षाव

४ नवीन वंदे भारत धावणार! PM नरेंद्र मोदींकडून हिरवा कंदील, वाचा थांबे अन् वेळापत्रक

SCROLL FOR NEXT