Omicron In Maharashtra | राज्यात ओमिक्रॉनचे 23 नवे रुग्ण; पाहा व्हिडिओ saamtv
मुंबई/पुणे

मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा सिलसिला सुरूच; ८,०६३ नवे रुग्ण

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढत होत असल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईमध्ये आज ८,०६३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस मुंबईवरील कोरोनचे संकट अधिकच वाढत चालले आहे. काल मुंबईमध्ये ६,३४७ रुग्ण आढळून आले होते. यात एक दिवलासादायक बाब म्हणजे आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाच मृत्यू झाला नाही. महाराष्ट्रात आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे ढग गडद होत चालले आहे. मुंबईत रोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढत होत असल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे ओमिक्रॉनबाधित रुग्णदेखील वाढत असल्याचे समोर येत आहे.

हे देखील पहा -

मुंबईतील रुग्णसंख्या 100 पर्यंत खाली आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने 8 हजारांचा टप्पा देखील पार केला आहे. मुंबईतल्या उच्चभ्रू वस्ती आणि इमारतीमधील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परदेशातून केलेला प्रवास, बैठका आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानं कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पुणे शहर कोरोना अपडेट

- दिवसभरात ५२४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात रुग्णांना ७९ डिस्चार्ज.

- पुणे शहरात करोनाबाधीत ०१ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१, एकूण ०२ मृत्यू.

-९९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५१११४१.

- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २५१४.

- एकूण मृत्यू -९११८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९९५०९.

- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६७८६.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Shortage : मुंबईत २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार; कुठे कमी दाबाने तर कुठे पूर्णपणे बंद? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: कळमेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचार सभेत आशिष देशमुखांचे वादग्रस्त वक्तव्य

चिमुकल्यांना कोंडून अंगणवाडीसेविका बैठकीला, अंगणवाडीसेविकेचा प्रताप, पालकांचा संताप

बीडमध्ये रक्षकच बनले भक्षक! मुंबईच्या सराफ व्यापाऱ्याला धमकावत उकाळले ४ लाख

Tere Ishq Mein: 'तेरे इश्क में'च्या रिलीजपूर्वी क्रिती सॅनन आणि धनुष पोहोचले वाराणसीला, गंगा आरतीचे फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT