Corona Virus Saam Tv News
मुंबई/पुणे

Corona Virus : कोरोनाचा JN1 व्हेरिएंट, जगावर चिंतेचं सावट; पुन्हा घ्यावी लागणार कोरोनाची लस?

Covid-19 Update : आता पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंटमुळं जगाचं टेन्शन वाढलंय. मात्र हा नवा व्हेरिएंट नेमका कोणता आहे? या व्हेरिएंटची लक्षणं काय आहेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

भरत मोहोळकर, साम टिव्ही

मुंबई : मृत्यूचं तांडव माजवणाऱ्या कोरोनानं पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलंय. आता कोरोनानं बहुरुप्यासारखं आपलं रुप बदललंय. कोरोनाचं जेएन 1 व्हेरिएंटनं चीन, सिंगापूर, थायलंडसह भारताचीही झोप उडवलीय. त्यामुळंच नव्या व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी पुन्हा कोरोना लसीचा डोस घ्यावा लागण्याची शक्यता आहे. मात्र जगाचं टेन्शन वाढवणारा हा जेएन 1 व्हेरिएंट किती घातक आहे?

जेएन 1 कोरोनाच्या ओमिक्रॉनचा स्ट्रेन आहे

इतर व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने प्रसार

WHO कडून 2023 मध्ये जेएन 1 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' घोषित

JN1 चे जवळपास 30 म्युटेशन्स

जेएन 1 व्हेरिएंट रोगप्रतिकार शक्तीवर हल्ला करतो

2020 मध्ये जगावर कोरोनाचं संकट आलं.. यामध्ये लाखो लोकांचा जीव गेला. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा जेएन 1 हा व्हेरिएंटनं जगाची चिंता वाढवलीय. तर या नव्या व्हेरिएंटचे सिंगापुरमध्ये 8 दिवसात 11 हजार रुग्ण आढळून आलेत. मात्र या व्हेरिएंटची लक्षणं काय आहेत?

जेएन 1 ची लक्षणं

ताप

थंडी

नाकातून पाणी गळणे

खोकला आणि घशात खवखवणे

थकवा

डोकेदुखी

चव व वास न येणं

जुलाब आणि पोटाच्या समस्या

खरंतर आशिया खंडातील देशात जेएन 1 व्हेरिएंट वेगाने पसरतोय. मात्र दुसरीकडे राज्य सरकारने थेट उपाययोजना करण्याऐवजी केंद्राच्या आदेशाची वाट पाहण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाचा नवा व्हेरिएंट पुन्हा तुमचं दार ठोठावत आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरं जायचं नसेल तर या नव्या व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी आत्तापासूनच खबरदारी घेण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT