मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : निवडणुकीत माझ्यासमोर उभे राहा, तुम्हालाही हरवेन; भाजप समर्थक आमदाराचं उद्धव ठाकरेंना आव्हान

उरण विधानसभा मतदार संघातील आमदार महेश बालदी ग्रामपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान हे वक्तव्य केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथ सुरु आहेत. सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे यांच्यावर चहूबाजूने टिकेच बाण सोडले जात आहे. शिंदे गट आणि भाजपकडून (BJP) त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यात आता भाजप समर्थक अपक्ष आमदाराची भर पडली आहे. आमदार महेश बालदी यांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान दिलं आहे.

आमदार महेश बालदी यांनी एक सभेत उद्धव ठाकरे यांना आपल्याविरोधात निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. मागील निवडणुकीत तुम्ही दोनदा आले तुमचा लेक एकदा आला तरी मी नाही हरलो. यंदा तर माझ्या मागे कमळ, मोदीजी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस असतील तुम्ही मला काय हरवाल, असं बालदी यांनी म्हटलं. उरण विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान ते बोलत होते. (Latest Marathi News)

मनोहर भोईर तर सोडाच तुम्ही येऊन इथे उभे राहा, तुम्हाला हरवेन असं जाहीर आव्हान देतो. तुम्ही तुमच्या लेकाला वरळीत उभे केल तेव्हा 3 उमेदवारांना विधानपरिषद दिल्या. तेव्हा तुमचा मुलगा विजयी झाला, असंही त्यांनी म्हटलं.

पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हा प्रकार थांबवण्यात यायला हवा. विरोधक जात, धर्म, पंथाची भाषा तेव्हाच करतात जेव्हा त्यांच्यातील कर्तृत्व संपते. माझ्यावरही आरोप झाले की मी मराठी नाही मारवाडी आहे बाहेरून आलेला आहे. पण मी त्याकडे लक्ष देत नाही. माझी एकच इच्छा आहे की महाविकास आघाडीचा मिळून एक उमेदवार यावेळी माझ्यासमोर उभा रहायला हवा. या सगळ्यांना एकदाच हरवून टाकलं की हे लोक गप्प बसतील अशी इच्छा महेश बालदी यांनी बोलून दाखवली. रायगड जिल्ह्यातील ग्रुप ग्रामपंचायत चौक, लोधिवली, आसरे व तुपगाव सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी भाजपाप्रणित परिवर्तन आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत महेश बालदी यांनी भाषण करताना आपले मत मांडलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT