MLA Suhas Kande's Serious allegation Saam TV
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदेंच्या हत्येचा कट होता! तरिही 'वर्षा'वरुन सुरक्षा नाकारली; आमदार सुहास कांदेंचे गंभीर आरोप

MLA Suhas Kande's Serious allegations On Uddhav Thackeray : मविआ सरकारच्या काळात एकनाथ शिंदेंचा खून करण्याचा प्रयत्न होता का? असा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. याकाळात माओवाद्यांनी एकनाथ शिंदेंची हत्या करण्याचा कट रचला होता. हे माहित असतानाही एकनाथ शिंदेंना तेव्हाच्या सरकारकडून झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात आली होती, त्यामुळे मविआ सरकारच्या काळात एकनाथ शिंदेंचा खून करण्याचा प्रयत्न होता का? असा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा न देण्याचा आदेश हा वर्षा बंगल्यावरुन आला होता असा गौप्यस्फोटही सुहास कांदे यांनी केला आहे. (Suhas Kande Latest News)

हे देखील पाहा -

शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास शिंदे यांनी आज सामटीव्हीशी बोलताना शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. या दरम्यान गडचिरोलीतून नक्षलवाद्यांकडून शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यानंतर गृहविभागाने शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा आमदार कांदे यांनी केला.

एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर वर्षा बंगल्यावरुन सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास त्यावेळेसचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन आला. यात झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती, असा गंभीर आरोप सुहास कांदे यांनी केला. एका मराठी माणसाला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिली गेली, तरीदेखील त्यांची सुरक्षा व्यवस्था का नाकारण्यात आली. मात्र, जे हिंदुत्वाविरोधात होते, त्यांना सुरक्षा व्यवस्था का दिली असा सवालही त्यांनी केला. याकूब मेननच्या फाशीला विरोध करणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या अस्लम शेख, नवाब मलिक यांच्यासोबत सत्तेत बसायचे का, असा सवालही त्यांनी केला.

पुढे सुहास कांदे म्हणाले की, ही बाब एकनाथ शिंदेंना कळली तेव्हा ते म्हणाले की, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मी आंनंद दिघेंचा शिवसैनिक आहे. मी कुणाला घाबरणारा नाही. मी शिवसैनिक आहे. मला काही झालं कर माझा शिवसैनिक मध माशांसारखा आहे. मला काही झालं तर नक्षलाईल्ज परिसरात जाऊन आम्ही त्याला खाऊन टाकू असं शिंदे म्हणाले होते असा दावा नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT