Congress movement SaamTv
मुंबई/पुणे

राहुल गांधींच्या ईडी चौकशीनं काँग्रेस आक्रमक; राजभवनावर मोर्चा धडकण्यापूर्वीच पोलिसांनी अडवला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तीन दिवसांपासून ईडी चौकशी करत आहे, या विरोधात देशात आंदोलन सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची मनी डॉड्रिंग प्रकरणात ईडी चौकशी करत आहे. याविरोधात काँग्रेसचे देशभर आंदोलन सुरू आहे. आज महाराष्ट्र काँग्रेसकडूनही आंदोलन सुरु आहे. काँग्रेसने राजभवन समोर आंदोलन सुरू केले आहे. 'राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी भाजपच्या सांगण्यावरुन केली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

या आंदोलनासाठी राज्यभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते आले आहेत. यावेळी पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा अडवला आहे. पोलीस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. राजभवनकडे जाण्यापासून आंदोलकांना रोखले जात आहे. आंदोलकांनी भाजप विरोधात घोषणा दिल्या.

या आंदोलनात राज्यातील काँग्रेस (Congress) नेत्यांनी समावेश केला आहे. मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री अमित देशमुख, डॉ.विश्वजीत कदम आदी काँग्रेस नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.'जुलमी राजवटी विरोधात आम्ही लढत आहोत, सुडबुध्दीचे वागणे थांबवावे अशी आमची मागणी आहे, अशा पद्धतीने कारवाया होणार असतील तर लोकशाहीचा हा घात आहे, असा आरोपही अमित देशमुख यांनी केला.

'केंद्र सरकार विरुद्ध रोष आहे, हे या आंदोलनातून दिसत आहे, काँग्रेसचा आवाज आता भाजपला दिसत आहे, त्यामुळे काँग्रेसची गळचेपी करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. राज्यपालांनी दखल घेतली नाहीतरी आम्ही हे लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

राजकीय संस्कृतीत असं कधी लोकशाहीला पाहायला मिळाले नाही. गांधी कुटुंबाचे देशाला मोठे योगदान आहे. लोकशाही टीकवण्याचे काम काँग्रेस करत आहे, असं मंत्री विश्वजीत कदम म्हणाले.

राहुल गांधींच्या ईडी चौकशीमुळे NSUI आक्रमक

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची गेल्या तीन दिवसांपासून 'नॅशनल हरॉल्ड' प्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे. या चौकशीविरोधात काँग्रेसने आंदोलन छेडले आहे. काल एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन करत ईडीचा (ED) निषेध केला. काल बुधवारी एनएसयुआयच्या दोन कार्यकर्त्यांनी दिल्लीतील कलावती रुग्णालयाजवळ असणाऱ्या एका पाण्याच्या टाकीवर सलग ६ तास चढून निषेध केला. (NSUI Workers Protest Against ED)

हे दोनही कार्यकर्ते एनएसयुआयचे आहे. यातील एक एनएसयुआयचे (NSUI) राष्ट्रीय सचिव विनोद जाखड आणि दिल्ली विद्याापीठातील दुसऱ्या वर्षातील निरज रॉय अशी या दोघांची नावे आहेत. या घटनेवर पोलिसांनी (Police) अजुनही प्रतिक्रीया दिलेली नाही. 'हे दोन्ही कार्यकर्ते सायंकाळी ४ वाजता पाण्याच्या टाकीवर चढले, आणि कित्येक तास ते टाकीवरच होते. या दोघांना राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन यांनी समजावले तेव्हा ते खाली आले' अशी माहिती एनएसयुआयचे राष्ट्रीय सचिव नितीश गौड यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, भिडे पूल पाण्याखाली

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT