Nana Patole In Dombivali
Nana Patole In Dombivali प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Dombivali: भूमिपुत्रांच्या समस्या काँग्रेस सोडवणार - नाना पटोलेंचं आश्वासन

प्रदीप भणगे

डोंबिवली: ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात भूमिपुत्रांच्या अनेक समस्या आहेत. या समस्येकडे तत्कालीन सत्ताधारी शिवसेना भाजपाने दुर्लक्ष केल्याने आता अखेर हे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रसेने (Congress) पुढाकार घेतला आहे. भूमिपुत्रांच्या (Bhumiputra) समस्या जाणून आणि सोडवण्यासाठी काँग्रेस तर्फे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) उपस्थित होते. या बैठकीसाठी महाराष्ट्र काँग्रसेचे सचिव आणि भूमिपुत्र नेते संतोष केणे यांनी पुढाकार घेतला होता.  (Congress will solve Bhumiputra problems said Nana Patole's assurance in dombivli)

हे देखील पहा -

दरम्यान भूमिपुत्रांच्या विविध संघटनांनी आपल्या समस्या प्रदेश अध्यक्ष पटोले यांच्या समोर मांडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने २७ गावातील विविध प्रश्न, १० गावातील ग्रोथ सेंटर, कल्याण शिळ रोड, अलिबाग वसई विरार कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, नेवाळी-भाल येथील जमीन प्रश्न तसेच गावठाण कोळीवाडे, गावठाण विस्तार, क्लस्टर, मुंब्रा रेतीबंदर येथील फ्लॅट धारकांचे विविध प्रश्न अश्या आणि विविध समस्या या प्रदेश अध्यक्ष पटोले यांच्यासमोर मांडण्यात आल्या. या सर्व समस्या नाना पटोले आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी जाणून घेत सोडवून देण्याचे भूमिपुत्र नेत्यांना आश्वासन दिले आहे. तसेच येत्या कालखंडात आपण स्वतः ग्रामीण भागात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी भूमिपुत्रांना दिले आहे.  

या बैठकीबाबत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव संतोष केणे यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यात भूमीपुत्रांच्या अनेक मागण्या आहेत आणि त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे भूमीपुत्रांच्या मागण्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. तसेच पालकमंत्री हे पालक आहेत या जिल्ह्याचे आणि त्यांचे चिरंजीव हे खासदार आहेत. मी कोणावर आरोप करत असताना विषय हे समाजाचे आहेत, भूमिपुत्रांचे आहेत आणि जनआक्रोश शेतकऱ्यांमध्ये आहे हे समजून घ्यावे. ज्यांना जनतेने सत्तेवर बसवलं आहे, त्यांना न्याय देण्याच काम सत्ताधाऱ्यांचं आहे आणि लोकांच्या मागणीसोबत काँग्रेस आहे. मागील वेळेस कल्याण-शीळ रस्त्याची बैठक झाली त्यावेळी त्यांनी एक समिती बनवली आणि आश्वासन दिलं. मात्र सत्ताधाऱ्यांनी दिलेलं कोणतंच आश्वासन पूर्ण केलं जात नाही.

वेळ पडली तर भूमिपुत्रांच्या न्यायासाठी आवाज उचलू आणि वेळ पडली तर जमिनीवर उतरून सुद्धा लढा देऊ असे केणे यांनी सांगितले. त्यामुळे भूमीपुत्रांच्या मागण्या व समस्या येत्या काळात सुटतील का हे पाहावे लागेल. सदर बैठकीला काँग्रेस कमिटीचे संपर्क प्रमुख, गजानन पाटील, प्रेमनाथ पाटील, जीवन मढवी, गजानन म्हात्रे, सुरेन कोळी, लक्ष्मण पाटील, गुरुनाथ पाटील, हनुमान पाटील, राहुल केणे, राजू भगत, निशा केणे, निलेश पाटील, पांडूरंग भोईर आणि विविध संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: शुक्र ग्रहाचे मेष राशीत संक्रमण, मेष ते मीन राशींवर काय होणार परिणाम? वाचा राशिभविष्य...

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

SCROLL FOR NEXT