Voter Day: मतदार जागृतीसह लोकशाही बळकटीची शपथ

मतदार जागृतीसह लोकशाही बळकटीची शपथ
voter day
voter daysaam tv
Published On

नंदुरबार : लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. युवक आणि नागरिकांनी राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदान करावे आणि मतदार जागृतीच्या कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Collector Manisha Khatri) यांनी केले. (nandurbar news Oath to strengthen democracy with voter awareness)

voter day
Republic Day: तुटपुंज्या व्यवसायातही देशभक्ती जपली; २८ वर्षांपासून तो करतो राष्ट्रध्वजाची इस्त्री

तहसिल कार्यालय नंदुरबार (Nandurbar) येथे आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस (Voter Day) कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसिलदार रिनेश गावीत आदी उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रियेत मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे नव युवकांनी मतदार जनजागृतीसाठी स्वत: व इतर नागरिकांना प्रोत्साहित करुन मतदार नोंदणी व मतदानाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांनीही मतदानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन लोकशाही अधिक बळकट करावी.

मतदानासाठी करावे प्रोत्साहीत

आज 18 वर्षांवरील नव मतदारांना प्रथम ई-पीक कार्ड वाटप करण्यात आले असून योग्य उमेदवार निवडून देशाचे उज्वल भविष्य घडविण्याची खुप मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे नवमतदारांनी स्वत: मतदानात सहभाग घ्यावा व इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे असे आवाहन केले. कार्यक्रमात नवमतदारांना ई-पीक अर्थात इलेक्ट्रॉनिक ओळखपत्राचे वाटप मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जागृतीची शपथ घेण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com