आगामी निवडणुकीत खुल्या जागेवर काँग्रेस देणार ओबीसीच उमेदवार- नाना saam tv
मुंबई/पुणे

आगामी निवडणुकीत खुल्या जागेवर काँग्रेस देणार ओबीसीच उमेदवार- नाना

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई : राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणूकांतील ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगीती दिल्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आता मतदार संघात जे उमेदवार ओबीसी आहेत त्यांना ओपनमधून निवडणून लढावी लागणार आहे. त्यामुळे आता भाजपा पाठोपाठ काँग्रेसनेही त्या जागांवर ओबीसीच उमेदवारांना संधी दिली जाईल अशी घोषणा केली आहे. भंडारा, गोंदिया जिल्हापरिषदेतील ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या आणि आता खुल्या झालेल्या जागांवर काँग्रेस ओबीसी (OBC Reservation) उमेदवार देणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

पुढे बोलताना नाना म्हणाले की या जागा खुल्या होऊन त्यावर १८ जानेवारीला निवडणूक होत आहे. २८ तारखेला अर्ज भरला जाणार आहे. सर्व जागांवर ओबीसी उमेदवार काँग्रेस (Congress) देणार आहे. ओबीसींवर जो अन्याय झाला तो दूर करणार असल्याचे पटोले म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीवर बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले ''दिल्लीवरून अध्यक्षपदाचे नाव आलेले नाही. राज्यपालांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत कळवलं आहे, पण त्यांच्याकडून अद्याप कोणतंही पत्र आलेलं नाहR. सोमवारी निवडणूक होणार आहे, हायकमांड यावर लक्ष देऊन आहे. उद्या संध्याकाळपर्यंत नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी मंजूरी दिली नाही तरी निवडणूक होणार आहे. राज्यपालांना कळवायचे होते, ते पत्र मंत्रीमंडळाने माहितीस्तव पाठवले आहे''.

चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांच्या विधानावर देखील नानांनी जोरदार टीका केली आहे. चंद्रकांत पाटील दर महिन्याला मुख्यमंत्री बनत होतेच. आता अडीच वर्षावर का आले ते विचारलं पाहिजे, हा हताशपणा आहे, त्यातून ते अशी वक्तव्य करत आहेत अशी टीका नानांनी चंद्रकांत पाटलांवर केली आहे. फडणवीसांच्या आरोपावर बोलताना नाना म्हणाले भाजप आणि फडणवीसांना विचारायचे आहे, केंद्र सरकारने जो सेस डिझेल आणि पेट्रोलवर लावला आहे त्याची माहिती जनतेला द्यावी, आणि मगच त्यांनी मोर्चे काढावे. महाविकास आघाडी सरकारने कोणतेही कर वाढवले नाहीत. हे फडणवीस यांच्या काळात लावलेले कर आहेत. केंद्र सरकारविरोधात महागाईची लाट आहे, हे आलेलं संकट राज्याच्या सरकारवर लोटण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असल्याची टीका नान पटोलेंनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चे बाबात विचारले असता नानांनी हात जोडले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT