'लिव्ह इन रिलेशनशिप अन् धोका'; हुंड्यासाठी उरकलं दुसरीसोबत लग्न

गोविंद जनार्दन घोडे असे फसवणूक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
'लिव्ह इन रिलेशनशिप अन् धोका'; हुंड्यासाठी उरकलं दुसरीसोबत लग्न
'लिव्ह इन रिलेशनशिप अन् धोका'; हुंड्यासाठी उरकलं दुसरीसोबत लग्नSaam TV
Published On

अविनाश कानडजे

औरंगाबाद : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मौज मजा करून हुंड्यासाठी दुसरी सोबतच लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे. शिक्षण घेतानाच कुटुंबातील सदस्यांनी नात्यातील मुलाशी लग्न जमवले त्यामुळे दोघे नियोजित वधू वर शहरातील बेगमपूरा भागामध्ये लिव-इन रिलेशनशिपमध्ये (Leave Iin Relationship) राहू लागले. परंतु तरुणाने हुंड्यासाठी दुसरी सोबतच लग्न आटोपल्याने उच्चशिक्षित मुलीने आता बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. गोविंद जनार्दन घोडे असे फसवणूक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

'लिव्ह इन रिलेशनशिप अन् धोका'; हुंड्यासाठी उरकलं दुसरीसोबत लग्न
अंड आधी की कोंबडी? प्रश्नाचं ठोस उत्तर शास्त्रज्ञांना सापडलं

एम फिल च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या उच्चशिक्षित 25 वर्षीय तरुणीची नातेवाईक असलेल्या गोविंद घोडे सोबत सन 2016 मध्ये ओळख झाली होती. दोघेजण नातेवाईक असल्यामुळे त्यांच्यामध्ये जास्तच भेटीगाठी वाढल्या होत्या. त्यानंतर तरुणीच्या घरच्यांनी गोविंद सोबत लग्नाची बोलणी केली असता त्याने दोघांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न करू असे सांगितले. तरुणी आपले राहिलेले शिक्षण औरंगाबाद (Aurangabad) मधील विद्यापीठात पूर्ण करत होती. दोघांच्याही घरचे लग्नाला (Marriage) तयार असल्यामुळे त्यांच्यामध्ये भेटीगाठी सुरू होत्या. यादरम्यान, तरूणी विद्यापीठातील एका वस्तीगृहात राहत होती. तर गोविंद घोडे हादेखील विद्यापीठातील एका वसतिगृहामध्ये राहत होता.

2020 मध्ये कोरोनामुळे (Corona) वस्तीगृह बंद झाले. त्यामुळे तरुणी तिची आई आणि गोविंद घोडे लग्न जमलेले असल्यामुळे बेगमपुरा भागात एका प्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले. याच काळात त्याने तरुणीला 20 लाख रुपये हुंड्याची मागणी केली. परंतु तरुणीच्या कुटुंबाने हुंड्यासाठी नकार दिला. त्यामुळे गोविंदने वेगवेगळी कारणे देत लग्नासाठी वेळ मारून नेली. आणि 28 मे 2021 रोजी माजलगाव तालुक्यातील एका मुलीशी लग्न केले. ही माहिती मिळताच तरूणीला धक्काच बसला त्यानंतर या उच्चशिक्षित तरुणीने बेगमपुरा पोलिस ठाण्यात गोविंद घोडे याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com