अंड आधी की कोंबडी? प्रश्नाचं ठोस उत्तर शास्त्रज्ञांना सापडलं

संशोधकांचे म्हणणे आहे की, अंड तयार करण्यासाठी ओव्होक्लाडीन (OC-17) नावाचे प्रोटीन आवश्यक आहे.
अंड आधी की कोंबडी? प्रश्नाचं ठोस उत्तर शास्त्रज्ञांना सापडलं
अंड आधी की कोंबडी? प्रश्नाचं ठोस उत्तर शास्त्रज्ञांना सापडलंSaam TV
Published On

अंडं पहिलं का कोंबडी? हा प्रश्न जगात वर्षानुवर्षे विचारला जात आहे. परंतु आता याचे उत्तर शास्त्रज्ञांना सापडले आहे. ब्रिटनमधील शेफिल्ड आणि वॉरविक विद्यापीठातील संशोधकांनी यावर संशोधन केले आहे. संशोधक डॉ. कॉलिन फ्रीमन सांगतात, बरेच दिवस आधी कोण आले याचे उत्तर देता येत नव्हते, पण संशोधनानंतर जगात पहिली कोंबडी आली हे सिद्ध झाले आहे. जाणून घ्या, संशोधनात कोणत्या गोष्टी समोर आल्या.

संशोधकांचे म्हणणे आहे की, अंड तयार करण्यासाठी ओव्होक्लाडीन (OC-17) नावाचे प्रोटीन आवश्यक आहे. हे प्रोटीन अंडी उत्पादनासाठी आवश्यक आहे. गरोदरपणात कोंबडीच्या गर्भाशयात हे विशेष प्रकारचे प्रोटीन तयार होते. यावरून अंडी नव्हे तर कोंबडी प्रथम आली हे स्पष्ट होते.

हे शोधण्यासाठी संशोधकांनी हायटेक कॉम्प्युटर HECtoR चा वापर केला. याद्वारे अंड्याच्या कवचाची आण्विक रचना समजली. संशोधनादरम्यान असे आढळून आले की OC-17 प्रोटीनच्या मदतीने अंड्याच्या शेलमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे रूपांतर सुरू होते. हळूहळू हे कवच घट्ट होऊ लागते आणि त्यात कॅल्साइट क्रिस्टल्स सापडतात.

संशोधक डॉ. कॉलिन म्हणतात, कोंबडीच्या हाडांमध्ये आणि अंड्याच्या कवचांमध्ये कॅल्साइट क्रिस्टल्स आढळतात. जेव्हा अंड पूर्णपणे तयार होते, तेव्हा ते बाहेर येते. बहुतेक कोंबडी दर 24 ते 36 तासांनी अंड घालते. ताजी अंडी रोज काढून टाकावी नाहीतर कोंबडी दुसरी अंडी घालेपर्यंत अंड्यांवर बसू शकते.

कोंबडी आधी आली की अंडी, याचे उत्तर सापडले आहे, पण जगात कोंबडीचा विकास कसा झाला, याचे उत्तर शोधायचे आहे. जगातील अनेक शास्त्रज्ञ त्यांच्या विकासाच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात गुंतले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com