मुंबई/पुणे

Pune Elections : काँग्रेसला मोठा धक्का, पुण्यातील नेत्याने ४० वर्षांची साथ सोडली, हातात घड्याळ बांधलं

Pune Municipal Elections : पुणे महापालिका निवडणुकीआधी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला. काँग्रेसचे उपाध्यक्ष मुख्तार शेख यांनी पुत्रासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी

Mukhtar Shaikh joins Ajit Pawar NCP in Pune : राज्यात महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुण्यात भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून लढणार आहे तर अजूनही महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बैठक सुरू आहेत, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जागावाटप सुरू असतानाच पुण्यात काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष असलेले मुख्तार शेख यांनी त्यांच्या पुत्रासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुख्तार शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

गेली ४० वर्ष काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ असलेले आणि दोन वेळा नगरसेवक राहिलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष मुख्तार शेख यांनी त्यांचे पुत्र विकार अहमद शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. गेली ४० वर्ष मी काँग्रेससाठी काम केलं. १९९२ पासून आत्तापर्यंत मी महापालिकेची निवडणूक लढवली आहे आणि दोन वेळा नगरसेवक म्हणून सभागृहात नागरिकांचे प्रतिनिधित्व केलं. प्रत्येक पालिका निवडणुकीत तसेच लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेस पक्षाने जी काही जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे मी निभावली, असे शेख म्हणाले.

याबाबत मुख्तार शेख म्हणाले की, १९९२ पासून काँग्रेससाठी काम केले. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात, आमच्या इथं बारा बलुतेदार समाजात काँग्रेस पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेस पक्षाने जे काही उमेदवार दिलं त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं. काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत अल्पसंख्याक समाजाला कोणतंही नेतृत्व करण्याची संधी दिली नाही आणि हीच बाब लक्षात घेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. येत्या निवडणुकीत आम्ही संपूर्ण समाजाला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Repo Rate : नव्या वर्षात EMI कमी होणार, RBI पुन्हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, वाचा अपडेट

Maharashtra Live News Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; या तारखेला करणार युतीची घोषणा

Shocking : पुण्यातून निवडणूक निकालसाठी गावाकडे गेला अन् खून झाला, चाकू-काठीने बेदम मारलं, लातूरमधील धक्कादायक घटना

Politics: ठरलं तर मग! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, २५-२६ डिसेंबरला करणार घोषणा

Diabetes skin symptoms: त्वचेवर दिसतात ही ७ लक्षणं, लगेच व्हा सावध, कधीही कंट्रोल न होणारा डायबेटिस होण्याचा धोका

SCROLL FOR NEXT