Mumbai BMC elections: Prakash Ambedkar’s statement sparks uncertainty over Congress–Vanchit alliance. saam tv
मुंबई/पुणे

BMC Election: मुंबई महापालिकेत काँग्रेस एकटी? वंचित बिघडवणार काँग्रेसचं गणित?

Congress-Vanchit Bahujan Aghadi Yuti: मुंबईत काँग्रेस आणि वंचितच्या युतीची चर्चा सुरु असतानाच प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचं टेन्शन वाढवलंय. मात्र प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य काय आहे. आणि आंबेडकरांच्या भूमिकेमुळे काँग्रेसची कशी कोंडी झालीय? पाहूयात.

Bharat Mohalkar

  • मुंबई महापालिका निवडणुकीआधी काँग्रेस-वंचित युतीवर संभ्रम

  • प्रकाश आंबेडकरांच्या स्वबळाच्या संकेतांमुळे काँग्रेसची कोंडी

  • मतविभाजनाचा धोका, काँग्रेसचं गणित बिघडण्याची शक्यता

ऐकलंत, मुंबईत महायुती आणि ठाकरेंपुढं आव्हान उभं करण्यासाठी काँग्रेसनं वंचितच्या रुपानं नवा भिडू शोधला. मात्र काँग्रेस आणि वंचितच्या युतीच्या चर्चा सुरु असतानाच प्रकाश आंबेडकरांनी स्वबळाचे संकेत देत काँग्रेसला गॅसवर ठेवलंय. खरंतर ठाकरे बंधू एकत्र येणं निश्चित झाल्यानंतर काँग्रेसने समविचारी पक्षांसोबत चर्चा सुरु केली.

10 दिवसात काँग्रेसच्या नेत्यांनी 4 वेळा प्रकाश आंबेडकरांची भेट घेत युतीची चर्चा केली. मात्र एका बाजूला जागा वाटपाची चर्चा सुरु असतानाच आता प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससमोर फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठेवून काँग्रेसचं टेन्शन वाढवलंय. यावर काँग्रेसनं मात्र सावध प्रतिक्रिया दिलीय.

प्रकाश आंबेडकरांनी एवढी थेट भूमिका घेतल्यानंतरही काँग्रेसला प्रकाश आंबेडकरांची साथ हवी असण्यामागचं कारण आहे वंचितचं उपद्रवमुल्य.

मुंबईत 49 जागांवर SC आरक्षण

प्रकाश आंबेडकरांमागे दलित समाजाची व्होटबँक

मुंबईत वंचितची 3 टक्के मतं

अनुसुचित जातींची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील

धारावी, कुर्ला, चेंबुर, मानखुर्द, घाटकोपर, मुलुंडसह कांदिवलीत वंचितची ताकद

वंचित स्वबळावर लढल्यास काँग्रेसच्या दलित, मुस्लीम मतांवर परिणाम

लोकसभा निवडणुकीआधीच वंचित काँग्रेससह महाविकास आघाडीत एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या.मात्र दोन्ही पक्ष सकारात्मक असताना जागावाटपावर युतीचं घोडं अडलं होतं. आताही पुन्हा काँग्रेसने एक पाऊल पुढं टाकलं असताना आंबेडकरांनी ताठर भूमिका घेतल्यानं काँग्रेसची कोंडी झालीय.

एका बाजूला ठाकरेंना नाकारलं असताना. पवारांनी ठाकरेंशीच युतीची चर्चा सुरु केलीय. तर वंचितसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरु असतानाच आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मुंबईत काँग्रेस एकटी पडण्याची शक्यता आहे. मात्र एकटी पडलेली काँग्रेस ठाकरेंसह महायुतीसोबत दोन हात करुन लोकसभेप्रमाणे मुसंडी मारणार की आकड्यांच्या खेळात आणखी गाळात जाणार? याचीच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्टी ऑल नाईट! पुणेकरांचा 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार, वाचा

Virat Kohli : विराट कोहलीचा नवा विक्रम; सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गेली नोकरी

Maharashtra Live News Update: काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

SCROLL FOR NEXT