Congress Vs BJP
Congress Vs BJP Saam TV
मुंबई/पुणे

'एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अन् दुसरीकडे देशाचे स्वातंत्र्य धोक्यात'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे -

मुंबई : 'राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सांगितलं की, 'आम्ही मोदी यांच्या अत्याचाराला घाबरणार नाही.' पण बेरोजगारी , महागाई , व्यापार असे जे इतर प्रश्न जे आहेत त्यासाठी हे आंदोलन आहे. खोटी स्वप्न दाखवून भाजप सत्तेवर आले आणि आता देश विकून कारभार सुरु आहे.

एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (Amrit Mahotsav of Freedom) आहे आणि दुसरीकडे देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्र सरकारवर केली आहे. ते पुढे म्हणाले, 'इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेंव्हा सुद्धा विरोधी पक्ष टिकला पाहिजे अशी भूमिका होती.

पाहा व्हिडीओ -

पण आता विरोधी पक्ष संपवून हुकूमशाही राबवली जातेय का ? असा सवाल जनता विचारत आहे. आपण पाहिले असेल की आपल्या मित्रांचे कर्ज माफ केले. नीरव मोदी असतील मेहुल चोक्सी असतील यांचे कर्ज माफ होतात आणि जनतेची लूट केली जात आहे. या विरोधात रोष निर्माण झाला असून याविरोधात लढाण्याची भूमिका काँग्रेसची आहे.

पोलीसी खाक्या दाखवून विरोधक गप्प केले जातं आहेत पण काँग्रेस घाबरणार नाही. आपल्या देशाचे प्रतीक आणि सन्मान हा तिरंगा आहे. आता कोण देशभक्त आहे किंवा नाही हे पाहायचे नाही. प्रत्येक घरात हा तिरंगा फडकला पाहिजे.

लोकशाही न मानणे ही भाजपची संस्कृती आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर केला. महाराष्ट्रात सध्या जे सरकार असंवैधानिक आहे. उशिरा न्याय हे सुद्धा घातक असल्याचं सुप्रीम कोर्टच्या लक्षात आलं आहे.

राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर अशी यात्रा आहे. यामुळे लोकल ते देशव्यापी प्रश्नांमध्ये हात घातला जाणार आहे. कोरोना काळात कसं चुकीचे झालं हे दाखवून देऊ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती वेळ काम करतात मला माहित नाही. पण त्यांची तब्येत खराब असेल तर त्यांना सदिच्छा आहेत. सुप्रीम कोर्टात आमचं लक्ष आहे असंही पटोले म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avinash Jadhav: खंडणीच्या आरोपानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया

Raveena Tandon: रविनाचा हवाहवाई लूक; पाहा फोटो..

Prakash Ambedkar Pune | प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

Today's Marathi News Live: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट

Ruchira Jadhav: अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

SCROLL FOR NEXT