nana patole and amit shah  saam tv
मुंबई/पुणे

Nana Patole| 'बाहेरच्या राज्यातील लोकांचं...' ; नाना पटोलेंचे अमित शाह यांच्यावर टीकास्त्र

बाहेरच्या राज्यातील लोकांचं महाराष्ट्रात चालत नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

सूरज सावंत

Nana Patole News : भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंबईत कुटुंबासह गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर एका बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाह यांनी शिवसेना आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. अमित शाह यांच्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'बाहेरच्या राज्यातील लोकांचं महाराष्ट्रात चालत नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सागर बंगल्यावरील बैठकीत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. 'उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला. २०१४ साली २ जागांसाठी शिवसेनेनं युती तोडली. एकनाथ शिंदे हीच खरी शिवसेना आहे आणि ती आपल्या सोबत आहे, असंही अमित शाह म्हणाले. सागर बंगल्यावरील बैठकीत त्यांनी टीका केली.

अमित शाह यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी नाना पटोले म्हणाले, 'प्रत्येक पक्षाला टार्गेट दिलं जातं. प्रत्येकाना आपापल्या पातळीवर प्रयत्न करतात. मात्र, याचा फटका आम्हाला बसणार नाही. यापूर्वी काँग्रेसचा स्वबळावर महापौर बसत होता. अमित शाह यांनी काय बोलावं ? हा त्यांचा प्रश्न आहे. स्वत: अमित शाह यांनी देशाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. शाह यांना कानशिलात लगावण्याची भाषा शोभत नाही. बाहेरच्या राज्यातील लोकांचं महाराष्ट्रात चालत नाही'.

'कोरोना काळात राहुल गांधी व सोनिया गांधी वेळोवेळी कोरोनाबाबत आवाहन करत असताना भाजपचे लोक थाळ्या वाजवत आणि दिवे लावत होते. नमस्ते ट्रम्प हे कोण करत होतं ? भाजप नेते महागाईवर बोलत नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng : तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाच बाजी मारणार, एजबॅस्टननंतर लॉर्ड्सवरही इंग्लंडचा संघ फेल होणार; फक्त...

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेतून वाचला विश्वास कुमार, पण मानसिक धक्क्याने हदरला

Itchy Nose Relief: नाकात वारंवार खाज येते? 'या' उपायांनी घरच्या घरी सहज आराम मिळवा

Skin Care: मेकअपशिवाय मिळवा नेचरल पिंक ग्लो, फोलॉ करा या टिप्स

Food Infection: फूड पॉइजनिंगची लक्षणं कोणती? तब्येत बिघडल्यावर कशी काळजी घ्याल?

SCROLL FOR NEXT