Congress Saam TV
मुंबई/पुणे

Congress: काँग्रेस प्रदेश प्रभारी राज्यातील काँग्रेस नेत्यावर नाराज

राष्ट्रवादीला विकास निधी यात जास्त वाटा मिळत असल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी (NCP) सत्तेत असून पक्ष संघटनेकडे लक्ष देत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : काँग्रेस (Congress) पक्षाची संघटनात्मक बांधणी यावरून काँग्रेस नेत्यांसमवेत एच के पाटील यांची एक आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये डिजिटल नोंदणी बरोबर पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर एच.के पाटील (H.K Patil) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीला विकास निधी यात जास्त वाटा मिळत असल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी (NCP) सत्तेत असून पक्ष संघटनेकडे लक्ष देत आहे असा दाखला देत त्यांनी काँग्रेस नेत्यांना पक्षकाम संघटना वाढविण्याकडे लक्ष देण्याच्या सुचना दिल्या आहेत.

काँग्रेस पक्षाने प्रदेश पातळीवर जास्त लक्ष देणे गरजेचे तसच मुंबई काँग्रेस पक्षाने अधिक चांगले संघटना बांधा अशा सूचना पाटील यांनी केली. काँग्रेस पक्ष ही सरकारचा महत्वाचा भाग आहे हे लक्षात ठेवा आणि सरकार चालवावे अशा सूचना या बैठकीत केल्याचे समजत आहे.

एकीकडे पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची झालेली पिछेहाट आणि राज्यात सरकारमध्ये असून ही नेत्यांनी पक्ष संघटनेकडे केलेल दुर्लक्ष तसंच काँग्रेसच्या नेत्यांना किंवा मिळणाऱ्या निधीबाबत त्यांनी या सुचना केल्या आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Vs Shiv sena: बोर्ड फाडले, एकमेकांना घातल्या लाथा; वरळीत भाजप-ठाकरे सेनेत का झाला राडा?

पुण्यातील २ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, पोलिस दलात मोठी खळबळ; नेमकं प्रकरण काय?

Ragda Patties Recipe: मुंबई स्पेशल स्ट्रीट स्टाईल रगडा पॅटीस कसा बनवायचा?

Nanded: २८०० मतदार ओळखपत्रांचा पत्ता कोचिंग क्लासेस अन् कॉलेज, निवडणूक विभागाचा अजब कारभार

Indigo Flight : घोळात घोळ! जायचं होतं पुण्याला पोचले मात्र हैद्राबादला! इंडिगोच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT