Congress fist list for bmc  Saam tv
मुंबई/पुणे

काँग्रेसची ८७ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; कोणाकोणाला मिळाली संधी? वाचा लिस्ट

congress-first-candidate-list-mumbai-bmc : काँग्रेसची ८७ जणांची पहिली उमेदवारी यादी जाहीर झालीये. कोणाला कुठून मिळाली संधी, जाणून घ्या

Vishal Gangurde

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलीये

पहिल्या यादीत ८७ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे

मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराला काँग्रेसकडून अधिकृत सुरुवात झालीये

काँग्रेसच्या पुढील यादीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत ८७ जणांच्या नावांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीच्या साथीने लढणाऱ्या काँग्रेसने आमदार-खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाचाही समावेश यादीत पाहायला मिळत आहे. राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे आणि आमदार अस्लम शेख यांच्या कुटुंबातील सदस्य यंदा रिंगणात पाहायला मिळेल.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र झाले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन एकत्र लढणार आहेत. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं जागावाटप देखील निश्चित झालं आहे. वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर निवडणूक लढणार आहे. तर काँग्रेस उर्वरित जागांवर निवडणूक लढणार आहे.

या निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्याच्या आदल्या दिवशी काँग्रेसने एकूण ८७ जणांची यादी जाहीर केली. पहिल्या यादीनंतर काँग्रेस दुसरी यादी कधी जाहीर करणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

वर्षा गायकवाड नाराज आहेत का?

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या, आम्हाला आनंद आहे की, आमची युती वंचित बहुजन आघाडीबरोबर झाली आहे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे. जाती-धर्माचे वातावरण निर्माण करू नये ही अपेक्षा आहे. काँग्रेस पक्षाची झालेली आघाडी ही ऐतिहासिक आहे. ही निवडणूक मुंबईला दिशा देणारी ठरेल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Threat Call: धक्कादायक! नांदेड बस स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी

दुबईत अडकलेल्या मराठी पर्यटकांना मदतीचा हात; IPF MahaHelpline च्या पुढाकारातून ५०० जण मायदेशी सुखरूप परतले

मुख्यमंत्र्यांसमोर 130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळा केला पोलिसांच्या स्वाधीन

आधी इराणचा गेम, आता 'या' देशांवर नेम, ट्रम्प यांचा नवा 'गेम प्लॅन' उघड

इराणच्या आडून अमेरिकेचा चीनवर हल्ला? चीनला ठेचण्यासाठी 'इराण' युद्धभुमी

SCROLL FOR NEXT