Atul Londhe Saam Tv
मुंबई/पुणे

Atul Londhe: तोंड दाबलेलं, हात पकडलेले, अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात

सुरज सावंत

मुंबई: काँग्रेसमुळे कोरोना वाढला.., असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत राज्यभरात काँग्रेसने आंदोलनं करण्यास सुरुवात केली. आज सोमवारी (14 फेब्रुवारी) भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील मलबार हिल परिसरातील सागर बंगल्याबाहेर काँग्रेस आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला ().

त्यामुळे काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर येणार हे निश्चित होतं. मात्र, आंदोलन सुरु होण्यापूर्वीच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे हे सागर बंगल्यावर पोहोचले आणि घोषणाबाजी करु लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी मोठ्याप्रमाणात बंदोबस्त तैनात करुन ठेवला होता. अशात मेघदूत बंगल्यावर अतुल लोंढे (Atul Londhe) आले आणि पाणी प्यायचंय असं सांगून ते मेघदूतमध्ये गेले. मेघदूतमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. 'महाराष्ट्र द्रोही बीजेपीचा निषेध असो', अशा घोषणा ते देत होते. तेवढ्यात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. गनिमी कावा करत अतुल लोंढेंनी फडणवीसांच्या बंगल्यासमोर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सूचकतेमुळे ते यशस्वी झाले नाहीत.

तोंड दाबलेलं, हात पकडलेले, अशा अवस्थेत अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात

स्वत: एसीपी राजेंद्र चव्हाण हे त्यावेळी तिथे उपस्थित होते. त्यांनीच अतुल लोंढे यांना ताब्यात घेतलं. अतुल लोंढे हे घोषणाबाजी करत असल्याने पोलिसांनी त्यांचे तोंड दाबले. तरीही लोंढे घोषणाबाजी करतच राहिले. पोलिसांनी त्यांचे हात पकडून तोंड दाबून अक्षरश: त्यांना ओढत ओढत जीपमध्ये बसवलं. त्यामुळे काहीकाळ येथे एकच गोंधळ माजला होता.

देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. फडणवीसांच्या बंगल्याकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच, पोलिसांचाही मोठा फौजफाटाही तैनात आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT